कतरिना कैफ बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना कैफने २००३ मध्ये बूम या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कतरिनाचा ‘न्यूयॉर्क’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात कतरिनाबरोबर जॉन अब्राहम मुख्य भुमिकेत होता. मात्र, एका गोष्टीवरुन कतरिनाला जॉनचा प्रचंड आला होता. त्या रागाच्या भरात तिला जॉनला या चित्रपटातून बाहेर काढायचे होते. खुद्द सलमान खानने याबाबात खुलासा केला आहे.

हेही वाचा- हनी सिंगचं ‘लुंगी डान्स’ हे गाणं शाहरुख खानला आवडलं नव्हतं; रॅपर म्हणाला, “घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर…”

कतरिनाने जॉनसोबत साया चित्रपट साइन केला होता. पण अचानक तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, कतरिनाने या मागचे कारण जॉन असल्याचे सांगितले होते. जॉनने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे कतरिनाला चित्रपटातून काढण्यात आले होते. याबाबत कतरिनाने सलमानला देखील सांगितले होते.

हेही वाचा- “मी या देशातच राहणार आणि इथेच..”; भारत सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आमिर खानचे स्पष्टीकरण, म्हणाला, “त्यावेळी..”

चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्यावर कतरिना प्रचंड चिडली होती. जॉनमुळेच तिला चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्याचा ठाम विश्वास कतरिनाला होता. न्ययॉर्क चित्रपटात जेव्हा कतरिनाला कळाले की तिच्याबरोबर जॉन अब्राहम आहे. तेव्हा कतरिनाला जॉनला चित्रपटातून बाहेर काढायचे होते. मात्र, त्यावेळी सलमानने तिची समजून घातली आणि त्यानंतर कतरिना जॉनबरोबर चित्रपट करण्यास तयार झाली होती.

हेही वाचा- हनी सिंगचं ‘लुंगी डान्स’ हे गाणं शाहरुख खानला आवडलं नव्हतं; रॅपर म्हणाला, “घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी स्पष्टीकरण देताना जॉन अब्राहम म्हणाला होता, ‘आम्ही सायाचे शूटिंग करत असताना जिस्म रिलीज झाला नव्हता. त्यावेळी मी नवखा होतो मी आजही आणि त्या वेळीही माझ्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना कतरीनाला काढून टाकण्यास सांगितले नव्हते. त्यावेळी मी स्वतःला कसे हाताळायचे याचा विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सेटवर गेलो तेव्हा मी निर्माता आणि दिग्दर्शकाला विचारले की कतरिना कुठे गेली?, त्यांनी सांगितले की तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.