बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरु आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्यापाठोपाठ आता आणखी एक बहुचर्चित कपल लग्नगाठ बांधणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व धामधुमीत कियाराची सासू आणि सिद्धार्थच्या आईने होणाऱ्या सूनेबद्दल भाष्य केले आहे.

कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ५ किंवा ६ फेब्रुवारीदरम्यान जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या या दोघांच्या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. कियारा आणि सिद्धार्थ हे दोघेही तिच्या कुटुंबियांसह जैसलमेरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
आणखी वाचा : “मला सांगायला आवडेल की…” कियाराशी लग्न करण्याबद्दल सिद्धार्थ मल्होत्राने सोडलं मौन

सिद्धार्थ मल्होत्राची आई रिमा मल्होत्रा आणि भाऊ हर्षद मल्होत्रा हे दोघेही लग्नासाठी पोहोचले. शनिवारी जैसलमेर विमानतळावर सिद्धार्थ मल्होत्राची आई, भाऊ हर्षद आणि त्याची पत्नी हे तिघेही विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

सिद्धार्थ मल्होत्राच्या कुटुंबियांनीही पापाराझींच्या या शुभेच्छा मोठ्या आनंदाने स्वीकारल्या. त्याबरोबर त्यांचे आभारही मानले. यावेळी एका पापाराझीने सिद्धार्थच्या आईला कियारा अडवाणीबद्दल विचारले. “कियारा तुमची सून होणार आहे, तुम्हाला कसं वाटतंय?” असा प्रश्न पापाराझींनी सिद्धार्थच्या आईला विचारला. त्यावर त्यांनी “मी फारच उत्साहित आहे” असे म्हटले. त्याबरोबरच सिद्धार्थ मल्होत्राचा भाऊ हर्षद यानेही त्यांच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला. “मी माझ्या भावाच्या लग्नासाठी फारच उत्सुक आहे”, असेही त्याने यावेळी म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहे. मात्र याबद्दल कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला कियारा-सिद्धार्थने बुक केला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.