अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा रंगत आहेत. अखेरीस ७ फेब्रुवारी (मंगळवारी) सिद्धार्थ व कियाराचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला चित्रपटसृष्टीमधील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. राजस्थान येथे जैसलमेरजवळ असलेल्या सूर्यगढ पॅलेस येथे या दोघांचं लग्न झालं.

आणखी वाचा – वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

कियारा अडवाणीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

जवळपास तीन दिवस सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाची धामधूम होती. शिवाय लग्नासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. लग्नात सारं काही खास असावं म्हणून सिद्धार्थ व कियारा यांनी स्वतः सगळी तयारी केली. शिवाय कियाराने लग्नात परिधान केलेल्या दागिन्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सिद्धार्थ व कियाराने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले. तसेच एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत चाहत्यांना लग्न झालं असल्याची आनंदाची बातमी दिली. दोघांनीही शेअर केलेल्या फोटोमध्ये कियाराचं मंगळसूत्र दिसलं. तर तिच्या डायमण्ड अंगठीचीही झलक पाहायला मिळाली. संपूर्ण सोन्यामध्ये कियाराने मंगळसूत्र बनवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

अगदी साधं पण लक्ष वेधून घेणारं कियाराचं मंगळसूत्र आहे. तर कियाराची अंगठीही अगदी खास आहे. तिने डायमण्डची अंगठी घातली आहे. तर लग्नात परिधान केलेल्या लेहेंग्यावर कियाराने घातलेले दागिने अगदी खास आहेत. कियाराच्या साध्या मंगळसूत्राच्या डिझाइनची तसेच अंगठीची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.