बॉलिवूडची बबली अभिनेत्री अमृता सिंहचे लाखो चाहते आहेत. अमृताने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपला दमदार अभिनायबरोबरच अमृता आपल्या वयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. अमृता सिंगने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले पण काही वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. नंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले. मात्र, जेव्हा सैफने करीनाशी लग्न केले तेव्हा अमृताची नेमकी प्रतिक्रिया काय होती? आणि अमृताचे सवत करीनाबरोबर नात कसं आहे? जाणून घेऊया.

अमृता सिंगने २००४ मध्ये सैफपासून घटस्फोट घेतला

अमृता सिंह जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा ती स्वतःहून १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफच्या प्रेमात पडली होती. दोघांनीही लग्न केले आणि त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले झाली. मात्र, काही वर्षांनी सैफ आणि अमृता यांच्यात भांडणे सुरू झाली. रोजच्या भांडणाला कंटाळून या जोडप्याने शेवटी २००४ मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला.

हेही वाचा- “तुम्ही मला इथे स्पर्श…”; शाहरुख खानबरोबर किसिंग सीन करण्यास पाकिस्तानी अभिनेत्रीने दिला होता नकार

सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले

सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला होता. अमृता तिच्या दोन मुलांसह सारा आणि इब्राहिमसह नवीन घरात शिफ्ट झाली. येथे बी-टाऊनची टॉप मोस्ट अभिनेत्री करीना कपूरने सैफच्या आयुष्यात प्रवेश केला. २००७ मध्ये करीना आणि सैफच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसून येत होते. यानंतर सैफ आणि करीनाने २०१२ मध्ये लग्न केले.

अमृता सिंगचे करीनासोबतचे नाते कसे आहे?

सैफ आणि करीना यांच्यातील नात्यामुळे अमृता सिंग चांगलीच संतापली असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. मात्र, अमृताने एका मुलाखतीदरम्यान या सर्व गोष्टी नाकारल्या होत्या. सैफ आणि करीना कपूरच्या नात्यामुळे मला कधीच अडचण आली नाही, असे अमृता म्हणाली होता. जर असे असते तर मी सैफच्या दुसऱ्या लग्नासाठी आमच्या मुलांना कधीही तयार केले नसते.

हेही वाचा- ७ कोटींचे दोन फ्लॅट बहिणीला गिफ्ट केल्यानंतर आलिया भट्टने स्वत:साठी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत जाणून अवाक् व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता सिंगच्या मुलांसोबत करीना कपूरचे खास नाते

करीना आणि अमृता एकमेकांशी बोलत नसतील, पण त्यांच्यात कधीही मतभेद किंवा वाद झाला नाही. त्यांनी कोणत्याही मुलाखतीत एकमेकांविरुद्ध कोणताही अपशब्द वापरलेला नाही. अमृता सिंगची दोन्ही मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान देखील करिनाचा खूप आदर करतात आणि दोघेही करीनाच्या खूप जवळ आहेत. अमृतानेही सारा आणि इब्राहिमच्या करीनासोबतच्या बाँडिंगवर कधीही आक्षेप घेतलेला नाही. सारा आणि इब्राहिम देखील त्यांचे सावत्र भाऊ तैमूर आणि जेह यांच्या खूप जवळ आहेत.