सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी पुन्हा बोहल्यावर चढले. गुरुवारी(२५ मे) आशिष यांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने रुपाली बरुआ यांच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आशिष विद्यार्थी यांनी साठीत दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता कमल आर खान(केआरके)ने ट्वीट केलं आहे. केआरकेने आशिष विद्यार्थी व रुपाली बरुआ यांचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. “६० वर्षांचे अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. थोडी तरी लाज बाळगायला हवी होती भाईसाहेब,” असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> UK मधील रेडिओलाही पडली ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, अंकुश चौधरी पोस्ट शेअर करत म्हणाला…
केआरकेने आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल केलेल्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे ट्वीट सध्या चर्चेत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत केआरकेला ट्रोल केलं आहे. “आमिरने केलं तर सिकंदर…आशिषने केलं तर बंदर” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “यात लाज कसली…तुला बोलताना लाज वाटत नाही का?” असंही एकाने म्हटलं आहे.
आशिष विद्यार्थी यांनी ११हून अधिक भाषांमध्ये काम केलं आहे. खलनायकाची भूमिका साकारुन बॉलिवूडमधील व्हिलन अशी ओळख त्यांनी मिळवली. हे त्यांचं दुसरं लग्न आहे. आरोशी बरुआ ही त्यांची पहिली पत्नी आहे. तिच्यापासून त्यांना अर्थ हा मुलगा आहे.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk tweet after bollywood actor ashish vidyarthi second marriage at age of 60 with rupali barua kak