प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर (आदिपुरुष ट्रेलर) व्हिडीओ आदल्या दिवशीच लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये या चित्रपटाची स्टारकास्टही सहभागी झाली होती. या व्हिडीओला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. हा रामायणावर आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये राम-सीतेची कथा दाखवण्यात आली आहे. याआधीही रामायणावर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. पण राम-सीतेवर आधारित पहिल्या हिंदी चित्रपटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

हेही वाचा- पाकिस्तानी अभिनेत्रीला करायची आहे भारताचे पंतप्रधान अन् ‘रॉ’ विरोधात तक्रार; दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत दिलं भन्नाट उत्तर

‘लंकादहन’ हा रामायणावर आधारित पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दादासाहेब फाळके यांनी केले होते. यामध्ये अण्णा साळुंके मुख्य भूमिकेत होते, ज्यांनी राम आणि सीता या दोघांच्याही भूमिका केल्या होत्या. चित्रपटात दुहेरी भूमिका साकारण्याची सिनेविश्वात ही पहिलीच वेळ होती. दादासाहेब फाळके यांनी साळुंके यांना सीतेची भूमिकाही ऑफर केली होती. कारण ते स्त्रियांप्रमाणे ?????पल्लू घालायचे.???? त्यांचे हात मऊ आणि कंबर बारीक होती. असे म्हटले जाते की, जेव्हा ते स्त्रीच्या गेटअपमध्ये यायचे तेव्हा त्यांना ओळखणे फार कठीण असे. सीतेच्या भूमिकेतही ते परफेक्ट दिसत. थिएटरमध्येही त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत होती.

रामायणावर पहिला हिंदी चित्रपट १९१७ मध्ये बनला होता

‘रामायण’वर आधारित ‘लंकादहन’ हा चित्रपट १९१७ साली तयार झाला होता. राम-सीतेची कथा पडद्यावर दाखवणारा हा मूकपट होता. यात पहिल्यांदाच दुहेरी भूमिका पाहायला मिळाली. यामध्ये अण्णा साळुंके यांनी राम-सीतेची भूमिका साकारून इतिहास घडवला. त्यांच्या अप्रतिम अभिनयाचे खूप कौतुक झाले. अण्णांनी स्त्रीची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय चित्रपटातही त्यांनी राणी तारामतीची भूमिका साकारली होती. मात्र, या भूमिकेसाठी ते आधी तयार नव्हते, कारण या भूमिकेसाठी त्यांना मिशी काढायला सांगितली होती. पण दादासाहेब फाळके यांनी त्यांचे मन वळवले आणि पहिल्यांदाच स्त्रीची भूमिका एका पुरुषाने साकारली.

हेही वाचा- “द केरला स्टोरी’ला विरोध करणारे राजकीय पक्ष हे…”; चित्रपटाबाबत स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया

तिकिटासाठी चित्रपटगृहांबाहेर मैलभर रांगा

लोकांना ‘रामायण’ची कथा खूप आवडली आणि त्यापेक्षा जास्त अण्णांची भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडल्याचे म्हटले जाते. रामायणाची तिकिटे घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटासाठी मैलभर लांब रांगा लागल्या होत्या. त्या वेळी तिकिटासाठी चित्रपटगृहांबाहेर चेंगराचेंगरी आणि मारामारी झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लंकादहन’ चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक चप्पल चित्रपटगृहांबाहेर काढून जायचे आणि हात जोडून बसायचे. केवळ १० दिवसांत या चित्रपटाने ३५ हजारांची कमाई केली होती आणि पैशांनी भरलेल्या पिशव्या बैलगाडीतून कार्यालयात नेण्यात आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. हा चित्रपट मुंबईतील चित्रपटगृहांमध्ये २३ आठवडे चालल्याचे सांगितले जाते.