Bollywood Actress Lara Dutta Personal Life: अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी घटस्फोटित अभिनेत्यांशी, खेळाडूंशी लग्न केले आहे. अशीच एक अभिनेत्री व माजी ‘मिस युनिव्हर्स’ तिच्या अफेअर्स व लग्नामुळे चर्चेत राहिली. या अभिनेत्रीचं नाव लारा दत्ता. इंडस्ट्रीत दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून सक्रिय असलेल्या लाराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

२००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातून लाराने बॉलीवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात प्रियांका चोप्रा अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटातील लाराच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली होती. लारा तिच्या चित्रपटांपेक्षा अफेअर्समुळेही राहिली. ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर जवळपास ९ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. या नात्याचा तिच्या करिअरवरही बराच परिणाम झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश भूपतीशी लग्न करण्यापूर्वी लाराचं केली दोरजीबरोबर अफेअर होतं. केली हा मॉडेल असून दोघे ९ वर्षे नात्यात होते. त्यांचं नातं जगजाहीर होतं, त्यामुळे ते लग्न करतील, असं वाटत होतं. पण, अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. अभिनेता डिनो मोरिया हे नातं तुटण्यास कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. केलीला लारा व डिनोचं अफेअर असल्याची शंका होती, त्यामुळे ब्रेकअप झालं असं बोललं जातं.

घटस्फोटित टेनिसपटूशी केलं लग्न

केलीपासून वेगळी झालेली लारा नंतर भारतीय टेनिसपटूच्या प्रेमात पडली. तिने महेश भूपतीशी १६ फेब्रुवारी २०११ रोजी लग्नगाठ बांधली. वर्षभराने २०१२ मध्ये ते मुलगी सायराचे आई-वडील झाले. लाराशी लग्न करण्यापूर्वी महेशचं एक लग्न मोडलं होतं. महेशच्या पहिल्या बायकोचं नाव श्वेता जयशंकर होतं. ती मॉडेल होती. लग्नाच्या सात वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर महेशने लाराशी लग्न केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Lara Dutta career
लारा दत्ता व तिचे कुटुंब (फोटो – इन्स्टाग्राम)

लारा आता चित्रपटांमध्ये फार सक्रिय नाही. ती कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. Facewiki.com च्या रिपोर्टनुसार, लाराची एकूण संपत्ती जवळपास ५३ कोटी रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी १-२ कोटी रुपये मानधन घेते. तसेच ती जाहिरातींमध्ये काम करते. लाराने तिच्या करिअरमध्ये ‘मस्ती’, ‘काल’, ‘नो एंट्री’, ‘भागम भाग’, ‘पार्टनर’, ‘हाउसफुल’, ‘डॉन २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.