हॅशटॅग मी टू चळवळ, कास्टिंग काऊच हे शब्द कलाक्षेत्रामध्ये काही नवीन नाहीत. चित्रपटात काम मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो असं काही अभिनेत्रींनी बऱ्याचदा स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांनादेखील या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. रणवीर सिंग, आयुष्मान खुराना यांसारख्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर घडला आहे. इतकंच नव्हे बॉलिवूडमधील दिग्गक अभिनेते अमरीश पुरी यांच्या नातवालादेखील याचा सामना करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरीश पुरी यांचा नातू वर्धान पुरी यानेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘ये साली आशिकी’ हा त्याचा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. या चित्रपटानंतर त्याच्याकडे ३ चित्रपट होते मात्र करोना महामारीमुळे हे चित्रपट बनू शकले नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने इंडस्ट्रीमधील अनुभवावर भाष्य केलं आहे.

“…म्हणून मी हिंदी चित्रपट”; निर्मात्यांच्या ‘त्या’ भूमिकेवर चिन्मय मांडलेकरने व्यक्त केली खंत

वर्धान पुरी गेली अनेकवर्ष इंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामदेखील केले आहे. तो असं म्हणाला की “बरेच लोक तुमच्याकडे थेट लैंगिक सुखाची मागणी करतात. काही म्हणतात की तू मला एवढे पैसे दे, मी तुला काम देईन. काही व्यक्ती सांगतात की मी तुला अशा व्यक्तीला भेटवतो जो तुझ्यासाठी चित्रपट लिहत आहे. नंतर येत ती व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये कोणाला ओळखत नसते. ती व्यक्ती इंडस्ट्रीचा भागदेखील नसते. ती व्यक्ती फक्त स्वतःची चांगली प्रतिमा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. अशा शब्दात त्याने आपला अनुभव सांगितला आहे.

वर्धान ३२ वर्षाचा असून त्याने आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली आहे. त्याने “दावत-ए-इश्क”, “इशकजादे” आणि “शुद्ध देसी रोमान्स” सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legend actor amirsh puris grandson talking about casting couch in bollywood spg
First published on: 19-01-2023 at 13:40 IST