चिन्मय मांडलेकर हा मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आता मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही त्याने आपला ठसा उमटवला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. तर सध्या तो ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने हिंदी चित्रपट का नाकारले यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिन्मय एक उत्तम अभिनेता आहेच त्याचबरोबरीने तो लेखक आणि दिग्दर्शकदेखील आहे. चिन्मयने फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत हिंदी चित्रपटांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे तो असं म्हणाला, “तेरे बिन लादेनमध्ये मी एका पोलिसाची भूमिका केली होती, त्यानंतर मला अशाच भूमिका विचारण्यात आल्या. त्यानंतर मी हिंदी चित्रपटांच्या मागे लागलो नाही. मला असे वाटले की निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच पोलिसाच्या भूमिकेत एक महाराष्ट्रीय म्हणून पाहतात.

Photos : हिंदू मंदिरात प्रवेश नाकारलेली ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?

चिन्मय पुढे म्हणाला, “तेरे बिन लादे’ननंतर मी ‘शांघाय’ आणि ‘भावेश जोशी सुपरहिरो’ हे चित्रपट केले. मी मराठी चित्रपटात काम करत राहिलो. नंतर गांधी गोडसे चित्रपट केला. द काश्मीर फाइल्सच्या बरोबरीने काही चांगले वेब शोदेखील केले.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली.

‘गांधी गोडसे’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांचं वैचारिक युद्ध पहायला मिळणार आहे. २६ जानेवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi godse actor chinmany mandlekar confessed that why he can not pursing hindi films spg
First published on: 18-01-2023 at 19:58 IST