Boney Kapoor On Sridevi: एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे महत्त्वाचे ठरते. जेव्हा चित्रपट फ्लॉप ठरतो, तेव्हा त्या चित्रपट निर्मात्याचेदेखील मोठे नुकसान होत असते.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निर्माते बोनी कपूर यांनी ‘मैदान’ चित्रपटामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते, याचा खुलासा केला होता. चित्रपटाचे शूटिंग कोविड १९ आधी सुरू झाले होते. मात्र, त्यानंतर कोविडमुळे काही काळ शूटिंग थांबले. त्या काळात जितके शूटिंग झाले त्यावर खूप खर्च झाला. आधी चित्रपटाचे बजेट १२० ठरले होते. मात्र, ते इतके वाढले की, चित्रपटाचा एकूण खर्च २१० कोटी इतका झाला.”
“जेव्हा २०२४ ला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्या चित्रपटाने फक्त ६८ कोटींची कमाई केली. त्यानंतर बोनी कपूर यांना विक्रेत्यांचे पैसे देण्यासाठी उधार पैसे घ्यावे लागले. त्यांच्यावर कर्ज झाले. मात्र, बोनी कपूर यांना असे नुकसान पहिल्यांदाच झाले नव्हते.
“ज्यावेळी मी निर्मिती केलेला…”
आता कोमल नाहटा यांना दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाबद्दलही वक्तव्य केले. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे बजेट मोठे होते. ते म्हणाले, “ज्यावेळी मी निर्मिती केलेला रूप की रानी चोरों का राजा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच वेळी पहलाज निहलानी यांचा आँखे हा सिनेमादेखील प्रदर्शित झाला. त्यांनी थोड्याफार प्रमाणात मार्केटिंग केले होते.”
“चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच जो ‘सैयारा’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्याचेही मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले नव्हते. चित्रपटाची गाणी व ट्रेलर यांतूनच चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली. पहलाज निहालानी यांचे धोरणदेखील तसेच होते.
त्यांनी चित्रपटाचे एकही होर्डिंग लावले नाही; फक्त पोस्टर्स लावली. परंतु, तो ब्लॉकबस्टर ठरला. ‘आँखे’च्या आधी ‘रूप की रानी…’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आम्ही जे मार्केटिंग केले होते, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली; मात्र चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.”
“आँखे चित्रपटाच्या शूटिंग सुरू असतानाच दिग्दर्शक शेखर कपूर यांनी तो चित्रपट मध्येच सोडला. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसऱ्या दिग्दर्शकाला घ्यावे लागले आणि त्याचा परिणाम चित्रपटावर झाला.”
‘गल्लाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर ‘आँखे’ चित्रपटाबाबत म्हणालेले, “या चित्रपटामुळे माझ्यावर १२ कोटींचे कर्ज झाले होते. पण, माझी पत्नी व माझे कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. माझी पत्नी माझ्याबरोबर होती. ती सिद्धिविनायकला अनवाणी पायाने चालत गेली होती. त्या कठीण काळात माझ्या भावांनीही मला साथ दिली.”
‘हॉलीवूड रिपोर्ट’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता अर्जुन कपूर म्हणालेला की, माझ्या वडिलांनी अनेकदा नुकसान सहन केलं आहे आणि त्यातून ते पुन्हा उभे राहिले आहेत. ते जोखीम घेतात. ते मनाने श्रीमंत आहेत.