scorecardresearch

Premium

दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मधुबाला, ‘तो’ चित्रपट निमित्त ठरला अन् मोडला साखरपुडा

एकेकाळी दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या मधुबाला

madhubala, dilip kumar, kishore kumar,madhur bhushan, Ataullah Khan, B R Chopra, naya daur, Mumtaz Begum, tragic love story of madhubala, madhubala death, madhubala childhood, madhubala name change, madhubala sister, madhubala kids, madhubala property, madhubala last film, madhubala affair, madhubala husband
(फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)

१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस. याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांचा जन्म झाला होता. एकेकाळी मधुबाला यांच्या निखळ सौंदर्याचे अनेक चाहते होते. आपल्या निरागस अभिनयातून त्यांनी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं मात्र तरीही त्यांच्या आयुष्यात त्यांना खरं प्रेम मिळू शकलं नाही. ज्या मधुबालांचे अनेक अभिनेते दिवाने होते त्या मधुबाला एकेकाळी अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या होत्या. पण त्यांचा साखरपुडा मोडला आणि मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं नातं ‘नया दौर’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी घडलेल्या एका प्रसंगामुळे संपुष्टात आलं. मधुबाला यांच्या बहिणीने स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे. या चित्रपटाचं शूटिंग ज्या ठिकाणी सुरू होतं तिथे चोरी- लूटमार करणारे डाकू असायचे. त्यामुळे मधुबाला यांच्या वडिलांनी लोकेशन बदलण्याचा प्रस्ताव ठेवला. पण दिग्दर्शक बी आर चोप्रा यांनी असं करण्यास नकार दिला. त्यावेळी मधुबाला आणि दिलीप कुमार यांचा साखरपुडा झाला होता. दिग्दर्शकांनी दिलीप कुमार यांनी मधुबालाला समजावण्यास सांगितलं. पण त्याने काहीच फरक पडला नाही याउलट मधुबाला यांच्या वडिलांनी पैसे परत करत अभिनेत्रीला चित्रपट सोडण्यास सांगितलं. ज्यामुळे चोप्रा प्रॉडक्शनने त्यांच्यावर केस केली जी जवळपास १ वर्ष चालली.

yulia shares first instagram post on putin critic alexei navalnys
‘I love You!’ पुतिन यांचे विरोधक अ‍ॅलेक्सी नवाल्नींच्या पत्नीची पोस्ट चर्चेत, पतीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त
banner welcoming Mahesh Gaikwad
महेश गायकवाड यांच्या स्वागताचे कल्याणमध्ये फलक, फलकांवर भावी आमदार, टायगर म्हणून उल्लेख
rain in Kailash Khers program the audience flees by covering chairs as umbrellas
वर्धा : कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात पावसाचे आगमन, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन; पाच हजार खुर्च्या गायब
hoarding against bjp mla ganpat gaikwad in kalyan east
कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या निषेधाचे फलक; फलकांमधून महेश गायकवाड यांचे समर्थन

आणखी वाचा- ‘प्यार कीया तो डरना क्या’ हे गाणं मधुबालावर नव्हे तर एका पुरुषावर झालं आहे चित्रित; जाणून घ्या संपूर्ण किस्सा

या दरम्यान मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यात बराच दुरावा आला होता. तरीही दिलीप कुमार यांनी मधुबाला यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला होता. पण मधुबाला यांनीही अट ठेवली की माझ्या वडिलांची माफी मागितली तरच मी लग्न करेन. असं करण्यास दिलीप कुमार यांनी नकार दिला आणि दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. १९६० मध्ये मधुबाला २७ वर्षांच्या होत्या आणि अभिनेते किशोर कुमार त्यांना बऱ्याच काळापासून लग्नासाठी विचारत होते. दिलीप कुमार यांच्यावर चिडलेल्या मधुबाला यांनी रागाच्या भरात किशोर कुमार यांना लग्नासाठी होकार दिला. पण या सगळ्या गोंधळात त्यांची तब्येत एवढी बिघडली की डॉक्टरांनी त्यांना लंडनमध्ये उपचाराची नेण्याचा सल्ला दिला.

आणखी वाचा- “मेरे बस में नहीं अब…” पाठकबाईंची राणादासाठी रोमँटिक पोस्ट, कमेंट करत हार्दिक जोशी म्हणाला…

मधुबाला यांच्या बहिणीच्या मते किशोर कुमार यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या खूपच एकट्या पडल्या. बंगल्यात डॉक्टर्स आणि नर्स यांच्यामध्ये त्या जगण्यासाठी धडपडत होत्या आणि किशोर कुमार त्यांना एकटं टाकून निघून गेले होते. वडिलांच्या संमतीनेच त्यांनी लग्न केलं होतं मात्र त्यांना प्रेम कधीच मिळालं नाही. ९ वर्ष त्या आजरपणाशी लढत राहिल्या आणि मग त्यांचं निधन झालं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Madhubala birth anniversary know about her love story with dilip kumar and kishore kumar mrj

First published on: 14-02-2023 at 17:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×