माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांना ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटात या दोघींनी एकत्र काम केले होते. यानंतर आता तब्बल २६ वर्षांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत माधुरी आणि करिश्माने आपल्या मैत्रीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

करिश्मा आणि माधुरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यास ‘आमच्या मैत्रीचा डान्स…’ असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये दोघीही “बलम पिचकारी…” या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दोघीही उत्कृष्ट डान्सर आहेत याची कल्पना सर्वांना आहेच, परंतु त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना २६ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल है…’ या चित्रपटाची आठवण झाली.

करिश्मा आणि माधुरीचा डान्स पाहून नेटकरी “‘दिल तो पागल है…’ या चित्रपटाचा भाग २ काढा…” तसेच अनेकांनी “आता फक्त शाहरुखची कमी आहे… तुम्हाला सर्वांना एकत्र बघायला आवडेल” अशा कमेंट्स या पोस्टवर केल्या आहेत. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटात माधुरी आणि करिश्माबरोबर शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्यात असलेल्या मैत्रीची झलक चाहत्यांना स्पष्टपणे दिसत आहे. यावर अलीकडच्या बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर, चित्रांगदा सिंग, भूमी पेडणेकर यांनीही कमेंट करीत दोघींचे कौतुक केले आहे.