Madhuri Dixit Dr. Shriram Nene Net Worth: ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. यशाच्या शिखरावर असताना माधुरीने लग्नाचा निर्णय घेतला होता. लग्न करून ती करिअर सोडून विदेशात निघून गेली होती.
माधुरी दीक्षितने १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि बॉलीवूड सोडून ती अमेरिकेत स्थायिक झाली. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या माधुरीच्या गृहिणी होण्याच्या निर्णयाने त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. माधुरीने लग्नानंतर पत्नी, आई व सून म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या.
माधुरीला दोन मुलं झाली, त्यांचा तिने सांभाळ केला. पण ती फार काळ अमेरिकेत राहू शकली नाही. तिला मुंबई खुणावत होतं. जवळपास १२ वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर ती पती व मुलांबरोबर मायदेशी परतली. मुंबईत आल्यावर ती रुपेरी पडद्यावरही परतली. तिने अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलं, तसेच चित्रपटही केले.
माधुरी दीक्षितचे मुंबईतील घर
‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर खूपच सुंदर आहे. माधुरी पती डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर ५३ व्या मजल्यावरील एका अपार्टमेंटमध्ये राहते. ती ५,५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या अपार्टमेंटमध्ये राहते. माधुरी दीक्षितच्या घरात एमएफ हुसैन यांच्या पेंटिंग्ज आहेत. म्युझिक इन्स्ट्रुमेंट्ससाठी माधुरीच्या घरात खास जागा आहे. तिच्या घरात कुटुंबाबरोबरचे जुने सुंदर फोटो आहेत. माधुरी व डॉ. नेने यांच्या लग्नातील जुने फोटोदेखील इथे पाहायला मिळतात. त्यांच्या मुलांबरोबरचे फॅमिली फोटोही इथे आहेत. माधुरीच्या घरातील गॅलरीतून समुद्र दिसतो.
माधुरी दीक्षितची संपत्ती किती?
आपला डान्स, सौंदर्य व अभिनयाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या माधुरी दीक्षितने ९० चं दशक गाजवलं. माधुरीने चित्रपट तर केलेच, त्याचबरोबर तिने अनेक ब्रँड्सच्या जाहिराती केल्या. तिचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. माधुरी दीक्षित कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्यासाठी ती १० कोटी रुपये घेते. माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती जवळपास २५० कोटी रुपये आहे.
डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती
डॉ. श्रीराम यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. ते कार्डिओव्हस्कुलर सर्जन आहेत. ते अमेरिकेतील सर्वात यशस्वी हार्ट सर्जन होते. अमेरिकेत बरीच वर्षे काम केल्यानंतर ते माधुरीबरोबर कायमचे भारतात परत आले. भारतातील आरोग्य क्षेत्रात ते काम करत आहेत. त्यांची पाथ फाइंडर हेल्थ सायन्सेस नावाची कंपनी आहे.
डॉ. नेने यांना लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे आलिशान कार्सचे कलेक्शन आहे. डॉ. नेने यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास ते जवळपास १०० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. डीएनएच्या वृत्तानुसार, ते एका महिन्यात सात लाख रुपयांहून जास्त कमाई करतात.
माधुरी दीक्षित पतीपेक्षा जास्त श्रीमंत आहे. दोघांची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये आहे.