Madhuri Dixit New Car: ‘धक धक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक लक्झरी कार अॅड केली आहे. त्यांनी नवीन फेरारी 296 GTS कार घेतली आहे. या कारचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माधुरीच्या या आलिशान कारची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल.

माधुरी दीक्षितच्या या नव्या कारचा रंग रोसो कोर्सा आहे. की कार खूपच आकर्षक आहे. एका पापाराझी अकाउंटवरून या कारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत माधुरी आणि श्रीराम एका इमारतीतून बाहेर येताना दिसत आहेत. माधुरीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर तिचे पती काळे शर्ट, काळी पँट व ब्लेझर घालून दिसत आहेत. या दोघांनी पापाराझींशी संवाद साधला व त्यानंतर ते नव्या कारमध्ये निघून गेले.

माधुरी दीक्षित (व्हिडीओ सौजन्य – मानव मांगलानी)

हेही वाचा – ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”

माधुरी दीक्षितच्या कारची किंमत किती?

फेरारी 296 GTS ची किंमत ६.२४ कोटी रुपये आहे. या कारमध्ये रिअर मिड-इंजिन व रियर व्हील ड्राइव्ह आहे. तसेच यात अॅक्टिव्ह स्पॉयलरसारखे अॅडव्हान्स अॅरोडायनामिक्स आहे, यामुळे कारची स्टेबॅलिटी व डाउनफोर्स वाढते. यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला होतो.

हेही वाचा – “मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”

माधुरी दीक्षितचे कार कलेक्शन

माधुरीकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक S560, रेंज रोव्हर वोग आणि इतर महागड्या कारचा समावेश आहे. फेरारी 296 जीटीएसच्या आधी त्यानी पोर्श 911 टर्बो एस घेतली होती. या कारची किंमत सुमारे ३.०८ कोटी आहे.

हेही वाचा – “मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९८० पासून ते आतापर्यंत तिने चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ती तिच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच नृत्यासाठीदेखील ओळखली जाते. लग्नानंतर चित्रपटांमधून ब्रेक घेऊन काही वर्षांनी तिने सिनेसृष्टीत पुनरागमन केले. ती नुकतीच कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांच्याबरोबर ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसली.