प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेत्री आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांची प्रकृती ठिक नसल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार महेश भट्ट यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. महेश यांची अँजिओप्लास्टी झाली असून ते सध्या आराम करत आहेत.

Video: राखी सावंतची सुटका! पोलीस स्टेशनबाहेर पडल्यावर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली, “मी माझ्या…”

महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्टने याबद्दल माहिती दिली आहे. महेश यांना या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.”आता सर्व काही ठीक आहे. ते रुग्णालयातून घरी परतले आहेत आणि आराम करत आहेत. यापेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण घरातील अनेक सदस्यांनाही रुग्णालयात जाण्याची परवानगी नव्हती,” असं राहुलने सांगितलं. ‘न्यूज १८’ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

दरम्यान, महेश भट्ट गेल्या महिन्यात त्यांच्या हृदयाच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, पण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर महेश भट्ट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि शस्त्रक्रिया पार पडली. राहुलशिवाय भट्ट कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने महेश यांच्या सर्जरी व प्रकृतीविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रीना रॉयना पती मोहसिन खानने काढलेलं घराबाहेर; एक्स शत्रुघ्न सिन्हांनी थेट पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना केलेला फोन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महेश भट्ट हे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ‘राज’, ‘जिस्म’, ‘पाप’, ‘मर्डर’, ‘रोग’, ‘जहर’, ‘मर्डर २’, ‘जिस्म २’, अशा चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्श त्यांनी केलंय. ‘१९२०: हॉरर ऑफ हार्ट’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अविका गौर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.