बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवे कलाकार येतात. स्टार किड्सबरोबर अनेक बाहेरचे कलाकारही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. पण अनेकदा स्टार किड्सना तुलनेत चांगली वागणूक मिळते असं नेहमीच बोललं जातं. पुढच्या वर्षी शाहरुख खानची लेक सुहाना, श्रीदेवी- बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. याशिवाय काजोलची मुलगी न्यासाचंही नाव चर्चेत आहे. अशातच आता बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत अभिनेत्री महिमा चौधरीच्या मुलीने प्रतिक्रिया दिली आहे.

एकेकाळी बॉलिवूड गाजवलेल्या महिमा चौधरीची मुलगी अरियानाने नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची आई महिमा चौधरी ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान मागच्या काही काळापासून ती ब्रेस्ट कॅन्सरमुळे चर्चेतही आहे.

आणखी वाचा- “व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…” ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

महिमा चौधरीने नुकतीच एका कार्यक्रमात मुलगी अरियानाबरोबर हजेरी लावली होती. यावेळी तिला बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच आई महिमा चौधरीच्या कामाचंही खूप कौतुक केलं. बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे. पण आईची इच्छा आहे की सध्या मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मी अजून खूप लहान आहे.”

आणखी वाचा- “सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान महिमा चौधरी ‘परदेस’ चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला होता. महिमाने नुकतीच ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. या भयंकर आजारावर मात करून ही अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. महिमा लवकरच कंगना राणौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.