अभिनेत्री व मॉडेल मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. ‘मुव्हिंग इन विथ मलायका’मध्ये तिचा बोल्ड आणि बिंदास अंदाज पाहायला मिळतोय. या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींशी ती मोकळेपणाने गप्पा मारते. यावेळी ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलताना दिसते. मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानशी घटस्फोट झाला आहे, पण या शोमध्ये ती खान कुटुंबाविषयी भरभरून बोलताना दिसते.

शोमध्ये करण जोहरशी बोलताना मलायका म्हणाली की, अरबाज खानच्या कुटुंबासाठी ती नंबर १ नाही, पण त्यांचा मुलगा अरहानमुळे सगळे तिला पाठिंबा देतात. अरबाज खानच्या कुटुंबाबद्दल पुढे बोलताना मलायका म्हणाली, “मी त्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कधीच येऊ शकत नाही. पण अरहानमुळे त्यांना माझी काळजी वाटते. हे करणं देखील योग्य आहे.” यावर मलायकाशी बोलताना करण म्हणतो, “तुझ्या अपघातानंतर संपूर्ण कुटुंब तुझ्याबरोबर होतं, ते आम्ही पाहिलं. पूर्ण खान कुटुंब तिथे होतं. खरं तर काही लोक कायम आपल्यासोबत असतात.”

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. जवळपास दोन दशकांनंतर २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. ते दोघेही २०१७मध्ये कायदेशिररित्या विभक्त झाले. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय, तर अरबाज मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपली नवीन नाती जाहीरपणे स्वीकारली आहेत. मात्र, घटस्फोट घेतल्यानंतरही आणि मूव्ह ऑन केल्यानंतरही ते दोघे त्यांचा मुलगा अरहानसाठी अनेकदा एकत्र दिसतात.