९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला अजुनही सिनेसृष्टीत सक्रिय आहे. मनीषा संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखतीत मनीषाने वैयक्तिक आयुष्य व जोडीदाराबद्दल मत व्यक्त केलं आहे.
‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत मनीषा कोईराला म्हणाली, “काही लोक भाग्यवान असतात ज्यांना आयुष्यात इतकं यश मिळतं, आयुष्यात फार कमतरता नसतात आणि त्यांचं जीवन शांत असतं. मी नशीबवान आहे की माझ्याकडे या सगळ्या अनुभवांचं मिश्रण आहे. निदान माझा जीवनाकडे पाहायचा दृष्टीकोन कडवट नसेल इतकीच मी आशा करू शकते आणि त्यावर माझं काम सुरू आहे. मी काय बदलू शकते आणि मी आयुष्याकडे कसे पाहते, यावर काम करतेय. आयुष्य त्रासदायक आहे का? नाही. खरं तर जेव्हा त्रासदायक अनुभव येतात तेव्हा मी त्यातून काही ती शिकतेच ना. मी आयुष्यातील अशा भयंकर आघाताचे अनुभव घेण्याच्या बाबतीत जास्त श्रीमंत झालेय, असं मला वाटतं.”
कोण आहेत रवीना टंडनचे पती? अनिल थडानी नेमका काय व्यवसाय करतात? जाणून घ्या
तुला आयुष्यात पुन्हा प्रेमात पडायचं आहे का? किंवा जोडीदार पुन्हा हवा आहे का? असं विचारल्यावर ५३ वर्षांची मनीषा म्हणाली, “होय. मी खोटं बोलत नाही असं म्हटलं तर मी खोटे बोलेन. माझ्या आयुष्यात कोणीतरी पुरुष नक्कीच असेल असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात जर माझा जोडीदार असता तर तो भेटल्यावर मला आनंद झाला असता. पण मला खूप प्रामाणिकपणे सांगायचं आहे की मी त्याची वाट पाहण्यात माझा वेळ वाया घालवणार नाही. माझ्या नशिबात लिहिलं असेल तर तो मिळेल. नसेल तर तेही ठीक आहे. आताही मी माझं जीवन पूर्णपणे जगत आहे, असं मला वाटतं.”
‘सैराट’ ला आठ वर्षे पूर्ण! अवघ्या चार कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने जगभरात कमावले होते तब्बल…
मनीषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास ती घटस्फोटित आहे. तिने २०१० मध्ये नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहलशी लग्नगाठ बांधली होती. सम्राट तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता, त्यांचा प्रेमविवाह होता, पण ते लग्न फार काळ टिकलं नाही. अवघ्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. २०१२ मध्ये पतीपासून विभक्त झाल्यानंतर मनीषा एकटीच आयुष्य जगत आहे.