हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

अभिनयाबरोबरच मनोज यांचं त्यांच्या फिटनेससाठीही प्रचंड कौतुक होतं. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोज यांनी त्यांच्या या फिटनेसमागचं रहस्य उलगडलं आहे. गेली १४ वर्षं मनोज यांनी रात्रीचं जेवण घेतलेलं नसल्याचा त्यांनी या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. याबरोबरच आपल्या या फिटनेसचं श्रेय मनोज बाजपेयी यांनी आपल्या आजोबांना दिलं आहे.

आणखी वाचा : ‘रामायण’ मालिकेत ‘लक्ष्मण’ हे पात्र साकारणाऱ्या सुनील लहरींची ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरवर प्रतिक्रिया; म्हणाले…

‘कर्ली टेल्स’ या यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयी म्हणाले, “मी गेली १३ ते १४ वर्षं रात्रीचं जेवण घेतलेलं नाही. माझे आजोबा प्रचंड काटक आणि कमालीचे फिट होते. गेल्या १३-१४ वर्षांपासून मी त्यांचंच डायट फॉलो करत आहे. यानंतर माझं वजन नियंत्रणात यायला सुरुवात झाली. यामुळे मला फारच उत्साही आणि निरोगी वाटायला लागलं आणि मी हीच गोष्ट कायम ठेवायचं ठरवलं. मी माझ्या वेळापत्रकानुसार त्यात बदल केले, त्यामुळे कधी कधी मी दोन जेवणांत १२ तास तर कधी १४ तासांचे अंतर ठेवतो.”

View this post on Instagram

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज यांच्या या नियमामुळेच आज ते इतके फिट दिसत आहेत. मनोज बाजपेयी यांचा “सिर्फ एक बंदा काफी है” हा आगामी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाट्यात सापडला आहे. आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन सीझन-३’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.