बॉलिवूडमधील अभिनेते जसे आपल्या अभिनयासाठी, स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत तर काही अभिनेते समाज सेवेसाठी प्रसिद्ध आहेत. सलमान खान, सोनू सूद या हे अभिनेते कायमच लोकांच्या मदतीसाठी धावून येत असतात. करोना काळात सोनूने काही लोकांना मदत केली होती. त्याने काही कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची सोय करुन दिली होती. तेव्हापासून सोनू सूदला फोन, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोक संपर्क करु लागले होते. सोनूने स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले. त्याच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक झाले.
गरजू लोक सोनूशी सोशल माध्यमातून संपर्क करत असतातच मात्र आता थेट त्याच्या घरापर्यंत पोहचले आहेत. नुकताच सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात सोनूच्या घराबाहेर अनेक लोक जमले आहेत. त्यांच्या त्यांच्या घेऊन आले आहेत. एका व्यक्तीकडे आपल्या मुलीच्या उपचारार्थ खर्च करण्यासाठी पैसे नाहीत तर एक वृद्ध महिला आपल्या मुलाच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून सोनूकडे मदत मागत होती. तर काहीजणांनी सोनूसाठी भेटवस्तू आणल्या आहेत. सोनूने सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
“महाराजांचा उल्लेख एकेरी…”; शरद केळकरने पत्रकाराला पुन्हा एकदा रोखलं
नुकताच सोनूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात त्याने मुंबईच्या लोकलमधून सामान्य माणसासारखा प्रवास केला होता. यावरून त्याचे कौतुकदेखील झाले. सोनू नुकताच ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात दिसला होता. सोनू सूद मूळचा पंजाबी असून त्याने आपले शिक्षण नागपूर येथून केले आहे. तामिळ चित्रपटातून त्याने अभिनय करण्यास सुरवात केली. ‘जोधा अकबर’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने, यांसारख्या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे.
सोनू सूद अभिनयाबरोबर अन्य व्यवसायदेखील करतो. मुंबईमधील काही हॉटेल्सचा तो मालक आहे. करोनाकाळात त्याने याच हॉटेल्सच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सध्या तो स्वतःच्या संस्थेतून गरजूंची मदत करत असतो.