Chhaya Kadam Post For Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने २ नोव्हेंबरला त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने किंग खानच्या अलिबागच्या फार्महाऊसवर खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला करण जोहर, अनन्या पांडे, फराह खान, करण जोहर असे शाहरुखचे बरेच मित्रमंडळी उपस्थित होते. संपूर्ण जगभरातून आज किंग खानवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय काही मराठी कलाकारांनी सुद्धा शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळालं.

लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांची काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानशी भेट झाली होती. छाया कदम यांना ‘लापता लेडीज’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शाहरुख हा शो होस्ट करत होता. त्यामुळे छाया कदम आणि शाहरुख यांची फिल्मफेअरच्या मंचावर भेट झाली. हा क्षण कायम माझ्या स्मरणात राहणार असं अभिनेत्रीने सांगितलं होतं. तसेच किंग खानच्या वाढदिवसानिमित्त छाया यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त छाया कदम यांची पोस्ट

२०२५ हे वर्ष सरत जाताना जणू काही माझ्या वाढदिवसाआधीच मिळालेली एक सुंदर भेट म्हणजे शाहरुख खान. क्षणापुरता पण आयुष्यभराचा त्यांचा मला लाभलेला इनक्रेडिबल असा सहवास जणू माझे वाढत जाणारे वय पुन्हा तारुण्यात आणण्याची जादू करणारा आहे. यावर्षीचा फिल्मफेअर आणि शाहरुख खान सरांची मिठी या निमित्ताने २३ ऑक्टोबरला असणारा माझा वाढदिवस तीन दिवस आधीच साजरा होण्यास सुरुवात झाली आणि अजूनही तो साजरा होत आहे. माझ्या जवळच्या प्रत्येकावर आपलेपणाची जादू केलेल्या शाहरुख खान सरांना वाढदिवसाच्या ‘जवान’ शुभेच्छा.

chhaya
छाया कदम यांची पोस्ट

कुछ कुछ होता है शाहरुख सर ।
खूप खूप प्रेम…लव्ह यू…लव्ह यू…लव्ह यू

दरम्यान, फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यावर छाया कदम भावुक झाल्या होत्या. यावेळी शाहरुख खानने त्यांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं.