कधी रोमँटिक हिरो तर कधी मुलींना गंडा घालणारा तर कधी खलनायक, अशा भूमिका करणारा अभिनेता रणवीर सिंग. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. मात्र त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले.रणवीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्याला आता मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये इतोल आयडॉल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच त्याला या पुरस्कारात मास्टर क्लास होस्ट करण्याचा मान मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माराकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा जगभरातील जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरस्कारासाठी रणवीरच्या निवड झाली आहे इतर अभिनेत्यांच्या तुलनेत वय कमी आहे. ऑस्कर आयझॅक, मॅरियन कॉटिलार्ड आणि टिल्डा स्विंटन यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत हा चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. ज्याचं होस्टिंग रणवीर सिंग करणार आहे.

“सगळ्या चित्रपटांचा…”; ऐंशी आणि नव्वदचे दशक गाजवणारे चार सुपरस्टार्स एकत्र

इतकंच नाही तर या चित्रपट महोत्सवात रणवीर सिंगच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ‘बाजीराव मस्तानी’, ‘गली बॉय’ आणि ‘पद्मावत’ या तीन उत्तम चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. पाओलो सोरेंटिनो, जेम्स ग्रे, मॅरियन कोटिलार्ड, सुझान बियर्स, ऑस्कर आयझॅक्स, व्हेनेसा किर्बी, डायने क्रुगर, जस्टिन कुर्झेल, एसी डेव्हिस, नादिन लबाकी असे दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.

रणवीर हा लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. सध्या तो आणि दीपिका सुट्टी एन्जॉय करत आहेत. याचा व्हिडीओदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miff 2022 ranveer singh to conduct first acting masterclass at marrakech international film festival spg
First published on: 10-11-2022 at 15:36 IST