scorecardresearch

‘ताल’ मधील बॅकग्राउंड डान्सर ते लोकप्रिय अभिनेता अन् डान्सर; मीराने पती शाहिद कपूरसाठी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शाहिदचा प्रवास सांगणारा व्हिडिओ रिपोस्ट केला.

Shahid kapoor Mira rajput journey reel background dancer taal actor Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
'ताल' मधील बॅकग्राउंड डान्सर ते लोकप्रिय अभिनेता अन् डान्सर; मीराने पती शाहिद कपूरसाठी शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत (Photo Courtesy- Social Media)

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे लेकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. शाहिद कपूरचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालाय. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शाहिदच्या प्रत्येक गोष्टीत मीरा नेहमीच त्याची साथ देताना दिसते. ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपटाचा रिव्ह्यू तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता आणि आता शाहिदचा अभिनय क्षेत्रातील प्रवास दाखवणारा चाहत्यांनी बनवलेला व्हिडीओ मीराने रिपोस्ट केला आहे.

शाहिद कपूर एक उत्तम अभिनेता व चांगला डान्सरही आहे. शाहिदच्या फॅन पेजवर डान्सरपासून अभिनेत्याचा प्रवास सांगणारा व्हिडीओ चाहत्यांनी बनवला होता. या व्हिडीओत ऐश्वर्या राय अभिनीत ‘ताल’ या चित्रपटातील शाहिदचा डान्स आहे जिथे शाहिद बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसत आहे तर पुढे ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या शाहिदच्या चित्रपटातील त्याचा आणि क्रिती सॅननचा दमाखेदार डान्सही यात आहे. “शाहिदचा डान्स पाहणं किती आनंददायी आहे, तो प्रशिक्षित डान्सर आहे आणि तो प्रत्येक गाण्याला न्याय देतो. एका बॅकग्राउंड डान्सरपासून ते उत्कृष्ट अभिनेता आणि नर्तक! शाहिद खूप अष्टपैलू आहे. एका व्यक्तीमध्ये इतक टॅलेंट आहे. त्याच्या चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनही कौतुकास्पद आहे,” असं कॅप्शन फॅनपेजवरील व्हिडीओला देण्यात आलं होतं.

kareena kapoor shahid kapoor video
बऱ्याच वर्षांनी जेव्हा शाहिद कपूर अन् करीना कपूर समोरासमोर येतात, अवॉर्ड सोहळ्यातील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
Anushka sharma and Virat Kohli Welcomes Baby Boy marathi news
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलं…
Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Jackky Bhagnani relation with Deshmukh family
रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ रिपोस्ट केला. या व्हिडिओला कॅप्शन देत मीराने लिहले, ‘ताल’ मधील बॅकग्राउंड डान्सरपासून आतापर्यंतच्या सर्व नृत्यांना त्याने मास्टरपिस बनवलं आहे.

हेही वाचा… दुसऱ्या लग्नानंतर चार महिन्यांनी ‘ही’ अभिनेत्री देणार गुड न्यूज? पहिल्या लग्नापासून आहे १३ वर्षांचा मुलगा

दरम्यान, शाहिदचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपट चौथ्या दिवशीही चित्रपटगृहात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. या चित्रपटात शाहिद कपूर एका रोबोट सायंटिस्टच्या भूमिकेत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन एआय रोबोटच्या भूमिकेत आहे. डिंपल कपाडिया, राकेश बेदी, राजेश कुमार या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mira rajput shared shahid kapoors journey reel from background dancer in taal to actor dvr

First published on: 12-02-2024 at 19:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×