Mithun Chakraborty’s Extramarital Affair : मिथुन चक्रवर्ती हे बॉलीवूड, तसेच बंगाली सिनेमातील मोठं नाव. त्यांनी त्यांच्या डॅशिंग अंदाजाने आजवर अनेकांची मनं जिंकली. विविध चित्रपटांत काम करीत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. परंतु, मिथुन अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असयाचे.
बॉलीवूडमध्ये अनेकदा कलाकारांची नावं एकमेकांबरोबर जोडली जातात, कधी कधी त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा सुरू असतात. पण, काही वेळा त्या चर्चा फक्त चर्चा नसून, सत्य परिस्थितीदेखील असते. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं जातं. त्यामध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाचाही समावेश आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार १९८० दरम्यान ‘जाग उठा इन्सान’ चित्रपटाच्या वेळी मिथुन व श्रीदेवी यांच्यामध्ये प्रेम फुललं आणि ते एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते अशा चर्चा आजही केल्या जातात. एवढंच काय तर १९८५ मध्ये त्यांनी गुपचूप लग्न केलं आणि ते दोघे १९८८ पर्यंत विवाहबंधनात असल्याच म्हटलं जातं. परंतु, याबद्दल त्यांनी कधीच कुठली प्रतिक्रिया दिली नाही.
मिथुन चक्रवर्तींच्या पत्नी योगिता यांनी केलेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न
मिथुन व श्रीदेवी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे मिथुन व त्यांच्या पत्नी योगिता यांच्यामध्ये तणावपूर्वक वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. मिथुन व योगिता यांना चार मुलं आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार योगिता यांना मिथुन यांच्या श्रीदेवींबरोबरच्या रिलेशनशिपमुळे इतका त्रास झालेला की, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
श्रीदेवींना जेव्हा कळलं की, मिथुन यांनी योगितांशी घटस्फोट घेतलेलाच नाही, तेव्हा त्यांच्या भावना आणखीनच दुखावल्या गेल्या आणि त्यांनी १९८८ मध्ये त्यांचं लग्न मोडलं. मिथुन यांनीही पत्नी योगिताला सोडण्यास नकार देत, त्यांनी श्रीदेवींबरोबरचे संबंध संपुष्टात आणले. श्रीदेवींनी पुढे निर्माते बॉनी कपूर यांच्याबरोबर १९९६ मध्ये लग्न केलं. त्यांना जान्हवी व खुशी कपूर अशा दोन मुली असून, दोघीही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.
दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.९०च्या काळात अनेक चित्रपटांत काम केल्यानंतर आजही ते अभिनय क्षेत्रात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतात.