scorecardresearch

वादग्रस्त ट्वीट केआरकेला पुन्हा भोवणार? कोर्टानं फेटाळली याचिका; मनोज बाजपेयींसाठी वापरलेले अपशब्द

मनोज बायपेयींनी केआरकेविरोधात दाखल केला होता मानहानीचा खटला, कोर्टात पार पडली सुनावणी

वादग्रस्त ट्वीट केआरकेला पुन्हा भोवणार? कोर्टानं फेटाळली याचिका; मनोज बाजपेयींसाठी वापरलेले अपशब्द
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

केआरके म्हणजेच अभिनेता कमाल राशिद खानने मनोज बाजपेयींबद्दल एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यानंतर मनोज बाजपेयींनी केआरकेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तो खटला रद्द करण्यात यावा, यासाठी केआरकेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. केआरकेने ट्वीटमध्ये मनोज यांना ‘चरसी व गंजेडी’ (व्यसनाधीन) असं म्हटलं होतं. त्यानंतर अभिनेत्याने केआरकेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, मनोज बाजपेयींना ‘चरसी व गंजेडी’ असं संबोधणं त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी पुरेसं आहे, असं निरीक्षण न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह यांच्या खंडपीठाने प्रथमदर्शनी असं नोंदवलंय. चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्याला सार्वजनिकरित्या ‘चरसी किंवा गंजेडी’ म्हणजेच व्यसनाधीन म्हणणे, हे त्याची लोकांमधील प्रतिमा आणि प्रतिष्ठा कमी करण्यासाठी पुरेसं कारण आहे, असं कोर्टाने म्हटलंय.

“मला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, तर मग सुशांतलाही…”; अमिताभ बच्चन व सलमान खानचा उल्लेख करत अभिनेत्याचा आरोप

दरम्यान, केआरकेने २६ जुलै २०२१ रोजी मनोज बायपेयी यांच्याबद्दल दोन बदनामीकारक ट्वीट केले होते. त्यात त्याने अभिनेत्याला नशा करणारा म्हटलं होतं. त्यानंतर मनोज बाजपेयी यांनी केआरकेविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केआरकेविरोधात कलम २०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजपेयींनी दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करावा, यासाठी केआरकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पण कोर्टाने केआरकेला फटकारत तो खटला रद्द करण्यास नकार दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 20:04 IST

संबंधित बातम्या