Mukesh Ambani visits Deepika Ranveer in Hospital : बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. रविवारी (८ सप्टेंबरला) दीपिकाने मुंबईत गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नानंतर सहा वर्षांनी या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. या दोघांवर सध्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहेत. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रुग्णालयात या जोडप्याची भेट घेतली.

रणवीर व दीपिकाने शुक्रवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. दोघांचे कुटुंबीयही यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यानंतर शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी तिला मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिने रविवारी ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माबाबत माहिती दिली. त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर सोशल मीडियावर दोघांवर सेलिब्रिटी व चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. चाहते त्यांच्या मुलीसाठी नावं सुचवत आहेत. दीपिका अजुनही रुग्णालयातच आहे, अशातच मुकेश अंबानी यांनी त्यांची भेट घेतली. ते रुग्णालयात जात असतानाचा व्हिडीओ विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचादीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली सुंदर नावं, तुम्हाला ‘या’ यादीतील कोणतं नाव आवडलं?

मुकेश अंबानी यांचा रुग्णालयात जातानाचा व्हिडीओ –

हेही वाचा – आमिर खानच्या सावत्र भावाशी पळून जाऊन केलं लग्न, ५ वर्षांत मोडला आंतरधर्मीय प्रेमविवाह; अभिनेत्री म्हणाली, “खूपच वाईट…”

अंबानी कुटुंबीय व रणवीर-दीपिकाचे जवळचे संबंध आहेत. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमाला दीपिका व रणवीर हजेरी लावत असतात. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात व रिसेप्शनमध्ये दीपिकाने रणवीरसह हजेरी लावली होती. तर रणवीर अनंत-राधिकाच्या दोन्ही प्री-वेडिंग, नंतर हळदी समारंभापासून ते लग्न, आशीर्वाद समारंभ आणि रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित होता. रणवीरने अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात खूप धमाल केली होती.

हेही वाचा – बाळाला जन्म देऊ शकत नाही ही ३२ वर्षीय सुप्रसिद्ध गायिका; खुलासा करत म्हणाली, “मला हे कळाल्यानंतर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिकाला गणेश चतुर्थीच्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी अंबानी कुटुंबाकडे बाप्पाचे आगमन झाले. दीपिका रुग्णालयात होती व रणवीर तिच्याबरोबर होता, त्यामुळे रणवीर व दीपिकाचे दोघांचेही वडील म्हणजेच दोन्ही व्याही अंबानींच्या घरी गणरायाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेले होते.