बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबरोबर एक खळबळजनक प्रकार घडला आहे. आलियाच्या घराच्या समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन गुपचूप फोटो काढणाऱ्यांवर तिने संताप व्यक्त केला आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे आलियाला पाठिंबा देत आहेत. तर दुसरीकडे आलिया भट्टच्या या तक्रारीची मुंबई पोलिसांनीही दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

आलिया भट्ट ही तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं तिला दिसलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला.

आलिया भट्टने ही घटना घडल्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांना टॅगही केले होते. यानंतर आता मुंबई पोलिसांनी आलियाच्या या तक्रारीची दखल घेत तिच्याशी संपर्क साधला आहे.
आणखी वाचा : “एखाद्याच्या खासगी आयुष्यात…” गुपचूप फोटो काढणाऱ्यांवर आलिया भट्टचा संताप, नेमकं काय घडलं?

“मुंबई पोलिसांनी आलिया भट्टशी संपर्क साधला असून तिला अशाप्रकारे फोटो काढणाऱ्या संबंधित छायाचित्रकाराबद्दल तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. त्याबरोबर ज्या ऑनलाईन साईटवर हे फोटो प्रकाशित करण्यात आले, त्यांच्याविरोधातही तक्रार करा, असे सांगितले. यानंतर आलिया भट्टच्या पीआर टीमने, आम्ही त्या ऑनलाईन साईटच्या संपर्कात आहोत”, असे पोलिसांना सांगितले आहे.

आणखी वाचा : “आमच्या मुलीचे फोटो…” आलिया भट्टच्या ‘त्या’ पोस्टनंतर अनुष्का शर्माने सांगितला अनुभव

आलिया भट्टच्या पोस्टमध्ये काय?

‘तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. प्रत्येकाला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. पण आज मला हे म्हणावं लागतंय की तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात, अशी पोस्ट आलियाने केली होती.