राज्यात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. राज्यातील ज्या थिएटर्सच्या स्क्रीनवर चित्रपट दाखवला जात आहेत, तिथून चित्रपट हटवा, असे त्या आदेश देताना म्हणाल्या. या वेळी त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’चा उल्लेख करीत टीका केली होती. त्यावर ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

हेही वाचा- जान्हवी कपूरच्या नव्या चित्रपटात दिसणार ‘हा’ मराठी अभिनेता, झलक आली समोर

काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी पठाणला फटकारणारे ट्वीट केले आहे होते, तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल तर हे पाहू नका. एवढेच नाही तर ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावर टीका करणाऱ्या एका लहान मुलीचा व्हिडीओही ट्वीट केला होता. व्हिडीओमध्ये मुलगी ‘बलात्कारासाठी चिथावणी देणारे’ गाणे म्हणत होती. विवेक अग्निहोत्रीच्या या ट्वीटवर लोक संतापले आणि त्यांनी अग्निहोत्रीच्या मुलीचे केशरी बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या फोटोनंतर विवेक अग्निहोत्रींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा– विवेक अग्निहोत्री यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस; दिग्दर्शक ट्वीट करीत म्हणाले…

मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर नेमकी कशी अवस्था झाली होती, याबाबत विवेक अग्निहोत्रींनी म्हणाले, ‘गेले एक वर्षं मी कसे जगत आहे हे फक्त मलाच माहीत आहे. मी तर लिहिले होते की स्वर्ग बनवायचा असेल तर नरकात राहावे लागेल. आज भारतातील राजकारणी आणि पत्रकार आणि अनेक सांप्रदायिक तथ्य तपासणार्‍यांनी माझ्या मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवरून मिळवीत ते सोशल केले. हा गुन्हा आहे. पण मी गप्प राहिलो. दिल्ली विधानसभेत विविध गोष्टी करण्यात आल्या. तेव्हाही मी गप्प राहिलो. पण लोकशाहीत चित्रपट निर्मात्याचे जगणे कठीण केले जात आहे. या विरोधात आवाज उठवून भावी पिढीसमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे, जेणेकरून सर्जनशील दिग्दर्शकाचा आवाज दाबून टाकण्याची हिंमत कोणी करू नये.

हेही वाचा- “आमची बदनामी…”, मनोज वाजपेयीच्या चित्रपटाला आसाराम बापू ट्रस्टनं पाठवली नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज होताच विवेक अग्निहोत्रीने बॉलीवूड गाण्यांवर टीका केली होती. आजकाल येणारी बॉलीवूड गाणी इन्स्टा रीलच्या खराब प्रतींसारखी दिसतात, असे अग्निहोत्री म्हणाले होते. यानंतर लोकांनी त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते.