Prateik Babbar Second Marriage:  ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्रतीकने शुक्रवारी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रतीकने आयुष्यात एक नवीन सुरुवात केली आहे, परंतु त्याचे कुटुंब नाराज आहे. प्रतीक व बब्बर कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. कारण प्रतीकने वडील राज बब्बर आणि सावत्र भाऊ आर्य बब्बरला लग्नाला बोलावलं नाही. आर्य बब्बरने प्रतीकच्या लग्नानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत घरातील सदस्यांचा उल्लेख करत आपल्या कुत्र्याला दोन गर्लफ्रेंड असल्याचंही म्हटलं आहे.

प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतंर सावत्र भाऊ आर्यने त्याला टोला लगावला. आर्य बब्बरने एक रोस्ट व्हिडीओ शेअर केला आहे. आर्य बब्बर हा स्टँड अप कॉमेडियन आहे. त्याने आपल्या भावाच्या दुसऱ्या लग्नानंतर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याच्या घरातील सदस्यांनी दोन-दोन लग्नं केली, त्याचा उल्लेख केला. आर्य म्हणाला की त्याचे वडील राज बब्बर यांनी दोनदा लग्न केले, बहीण जुहीने दोनदा लग्न केले आणि आता सावत्र भाऊ प्रतीकनेही दुसरं लग्न केलं.

आर्य बब्बरने प्रतीकच्या दुसऱ्या लग्नाची खिल्ली उडवली आणि म्हणाला की “आता “माझ्या कुत्र्यालाही २-२ गर्लफ्रेंड्स आहेत.” त्यानंतर आपल्याला घटस्फोटाच्या प्रक्रियेची भीती वाटत असल्याचं तो हसत म्हणाला. “मलाही दुसरं लग्न करायचं आहे पण घटस्फोटादरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांची भीती वाटते. मला दुसरं लग्न करण्यात लग्नात काहीही अडचण नाही, पण घटस्फोटाच्या कॉम्प्लीकेशन्समधून जाण्यासाठी मी खूप आळशी आहे,” असं आर्यने म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
who is priya banerjee wife of prateik babbar
प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नातील फोटो (सौजन्य इन्स्टाग्राम)

पाहा व्हिडीओ –

प्रतीक बब्बरने लग्नात बोलावलं नाही, त्यामुळे आर्यने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. प्रतीकच्या लग्नाबद्दल वर्तमानपत्रातून समजलं, असंही आर्यने सांगितलं. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आर्यने प्रतीकच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं कोणीतरी त्याला कुटुंबाविरोधात केलं आहे. त्याला आमच्या कुटुंबातील कोणाच्याही संपर्कात राहायचं नाही. त्याने कोणाला फोन केला नाही,” असं आर्य म्हणाला. प्रतीकची सावत्र आई नादिरा बब्बर यांना न बोलवणं समजू शकतो, पण किमान त्याने वडील राज बब्बर यांना आमंत्रित करायला हवं होतं, असं आर्य म्हणाला. “आमचं आयुष्य हे चित्रपटापेक्षा कमी नाही, कोणाच्या तरी प्रभावामुळे तो असं करत आहे; कारण प्रतीक असा नाही,” असं आर्य म्हणाला.