निर्माता साजिद खान मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. साजिद खानने ‘बिग बॉस १६’मध्ये एंट्री घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सातत्याने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले जात आहे. शर्लिन चोप्रा आणि इतर काही अभिनेत्रींनीही साजिद खानवर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी होताना दिसत आहेत. अशात आता मॉडेल नम्रता शर्मा सिंहने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, नम्रता शर्मा सिंहने सांगितलं की, २०११ मध्ये साजिद खानने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती ऑडिशनसाठी त्याला भेटायला गेली होती. नम्रताने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, जेव्हा ती साजिदला भेटायला गेली होती तेव्हा तिने शॉर्ट ड्रेस घातला होता आणि रुममध्ये प्रवेश करताच साजिदने दरवाजा बंद केला.

आणखी वाचा- ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानच्या वर्तणूकीवरून नेटकरी संतापले; गोरी नागोरीशी वाद ठरला निमित्त

नम्रता शर्मा सिंग पुढे म्हणाली, “माझं बोलणं कोणीही ऐकू नये असं साजिद खानला वाटत होतं. खरं तर मी ऑडिशन आणि फी संदर्भात बोलण्यासाठी साजिद खानला भेटायला गेले होते. दरवाजा बंद केल्यानंतर त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्यांच्यावर ओरडले आणि त्याला धक्का दिला.”

आणखी वाचा- पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राज कुंद्राने केलं शर्लिनच्या अश्लील व्हिडिओबद्दल वक्तव्य; म्हणाला, “ती समाजासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साजिद खानबद्दल बोलताना नम्रता शर्मा सिंह म्हणाली, “नंतर मला लोकांकडून समजलं की साजिद खानच्या चित्रपटात काम करण्यासाठी अनेकदा साजिदबरोबर शरीरसंबंध ठेवावे लागतात. या घटनेनंतर मी कधीही साजिदला फोन केला नाही किंवा भेटले नाही. मी ती घटना विसरले होते पण ‘बिग बॉस १६’ मधील त्याच्या एंट्रीनंतर त्याबद्दल बोलायचं ठरवलं.” दरम्यान नम्रता शर्मा सिंहने १२ वर्षांनंतर याचा खुलासा केला आहे. २००७ ते २००९ या काळात नम्रता एक यशस्वी रॅम्प मॉडेल होती. तिने अनेक लोकप्रिय ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत.