‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘द वॅक्सीन वॉर’ हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये कोणते कलाकार झळकणार याबाबत गेले कित्येक दिवस चर्चा सुरू होती. आता चित्रपटामधील कलाकारांची नावं समोर आली आहेत.

आणखी वाचा – Video : खऱ्या आयुष्यात आलिशान घरात राहते ‘तू तेव्हा तशी’मधील अनामिका, शिल्पा तुळसकरनेच शेअर केला व्हिडीओ

‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. अनुपम खेर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांनी क्लॅपबोर्डचा फोटो शेअर करत ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटात काम करणार असल्याचं सांगितलं आहे.

अनुपम खेर म्हणाले, “मी माझ्या ५३४व्या चित्रपटाची घोषणा करत आहे. विवेक अग्नीहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपट. जय हिंद.” म्हणजेच अमुपम यांचा हा ५३४वा चित्रपट आहे. त्याचबरोबरीने नाना पाटेकरही या चित्रपटामध्ये काम करताना दिसतील.

आणखी वाचा – “ती माझ्या आयुष्यातील…” अमृता देशमुखबरोबर असलेल्या नात्याबाबत प्रसाद जवादेचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच नाना पाटेकर या चित्रपटामध्ये काम करणार असल्याचं विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं होतं. २०१८मध्ये प्रदर्शित झालेला ‘काला’ हा नाना यांचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगूसह एकूण दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी १५ ऑगस्टला ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपट प्रदर्शित होईल.