नाना पाटेकर (Nana Patekar) ‘नाम फाउंडेशन’ चालवतात. या माध्यमातून ते शेतकरी आत्महत्येसंदर्भात जनजागृती करतात. नाना पाटेकर यांचे अनेक अधिकारी मित्र आहेत. गावाकडे रमणाऱ्या नाना पाटेकरांनी त्यांच्या एका मित्राचा किस्सा सांगितला आहे. नाना पाटेकरांसाठी मित्राने मटणाचा बेत केला. त्यानंतर बोकड पुण्याला आणतानाचा मजेशीर प्रसंग त्यांनी सांगितला आहे.

नाना लवकरच ‘वनवास’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका बोकडाला बाम लावल्याचा किस्सा सांगितला. ‘एचटी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले, “माझा एक मित्र होता, कलेक्टर होता. तो नेहमी मला जेवायला बोलवायचा. शूटिंग असायचं, त्यामुळे माझं जाणं व्हायचं नाही. मग एक दिवस मीच त्याला फोन केला आणि म्हटलं ‘अरे मी येतोय’. मी जेवायला येतोय असं म्हटल्यावर ‘आज येताय का’ असं त्याने विचारलं. म्हटलं ‘का नको येऊ का’? तो म्हटला या या.”

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

…अन् बोकडाला बाम लावला

पुढे नाना म्हणाले, “त्याने त्याच्या मित्रांना उस्मानाबादला फोन केला. ‘नाना जेवायला येत आहेत, बोकड घेऊन या लगेच’. ते उस्मानाबादहून बोकड घेऊन गाडीने पुण्याला निघाले, गाडीत एसी होता. एसीमध्ये ते बोकड शिंकायला लागलं. त्यांना वाटलं हे बोकड पुण्यापर्यंत जिवंत जातं की नाही. त्यांनी मध्ये गाडी थांबवली, बाम घेतला, बोकडाच्या छातीवर बाम चोळला; मग पुण्यात येऊन त्यांनी बोकड कापला.”

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पाटेकर हा किस्सा सांगताना हसू लागले. माझे मित्रच असं करू शकतात. ‘मरू नको लेका, पुण्याला जायचंय’ म्हणत बोकडाच्या गळ्याला आणि छातीला बाम चोळला, असं नाना म्हणाले.