बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीचे नाव सध्या चर्चेत आहे, याचे कारण म्हणजे तिची बहीण आलिया फाखरीचे नाव तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्सच्या हत्येच्या आरोपांमध्ये समोर आले आहे. नर्गिसने या चर्चेदरम्यान पहिल्यादांच सोशल मीडियावर पोस्ट केली असून ही पोस्ट व्हायरल होत आहे.

नर्गिसने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीत नर्गिसने फोटो पोस्ट केला असून त्याला एक लहानसे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा…जान्हवी कपूरचं टी-शर्ट पाहिलंत का? बॉयफ्रेंड शिखर पहारियाच्या नावाने वेधलं लक्ष, पाहा फोटो

स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती ‘हाऊसफुल ५’मधील सोनम बाजवा आणि जॅकलीन फर्नांडिस या दोन अभिनेत्रींबरोबर दिसत आहे. या फोटोसह तिने “आम्ही येतोय!” अशी कॅप्शन दिली आहे. ‘हाऊसफुल ५’मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान यांच्यासह अनेक कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे. हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहेत.

आलिया फाखरीवरील आरोप

नर्गिस फाखरीच्या बहिणीवर तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर एडवर्ड जेकब्सच्या हत्येचा आरोप आहे. तिला अमेरिकेतील रायकर्स आयलंड, न्यूयॉर्क येथे अटक करण्यात आली आहे. डेली न्यूजच्या रिपोर्टनुसार, आलियावर दोन मजली गॅरेजला आग लावून एडवर्डचा आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप आहे. तिला जामीन नाकारण्यात आला असून तिच्यावर हत्येचे आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, आलियाने कोर्टात ती स्वतः निर्दोष असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा…जुनैदच्या हिरोईनने आमिर खानला ओळखलंच नाही; मेसेजवर विचारलं ‘तुम्ही कोण?’, अभिनेत्रीने स्वतःच सांगितला किस्सा

कुटुंबीयांचे स्पष्टीकरण

आलियावरील आरोपांवर नर्गिसच्या आईनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मुलीने कोणाचीही हत्या केली असेल असे मला वाटत नाही. ती अतिशय प्रेमळ स्वभावाची आहे आणि नेहमी इतरांना मदत करत आली आहे,” असे तिच्या आईने सांगितले.

Nargis Fakhri sister murder allegations,
नर्गिसने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती ‘हाऊसफुल ५’मधील सोनम बाजवा आणि जॅकलीन फर्नांडिस या दोन अभिनेत्रींबरोबर दिसत आहे. (Photo Credit – Nargis Fakhri Instagram)

हेही वाचा…एकेकाळी ज्याला म्हटलं ‘झुरळ’, आता त्याच अभिनेत्याच्या चित्रपटाचं खासदार कंगना रणौत यांनी केलं कौतुक; म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नर्गिस फाखरीचे आलिया फाखरीबरोबर फारसे जवळचे संबंध नसल्याचे समोर आले आहे. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, नर्गिस गेल्या २० वर्षांपासून तिच्या बहिणीच्या संपर्कात नाही. हा प्रकार समजल्यावर ती देखील इतरांप्रमाणेच बातम्यांमधून त्याबद्दल माहिती मिळवत आहे, असे सांगण्यात आले.