बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा अनेकदा चर्चेत असते. सध्या ती मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नव्या रस्त्याच्या कडेला चाट-पापडीचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. तिचा हा साधेपणा पाहून चाहतेही तिचं कौतुक करत आहेत.

श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा हिने सोशल मीडियावरून तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. ती सध्या भोपाळला गेली आहे. नव्याने फोटो शेअर करून तिच्या या ट्रिपची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये ती भोपाळच्या रस्त्यांवर फिरत असल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा स्वेटर आणि पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पंढरी पँट परिधान केली आहे. ती अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा :अखेर प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नव्या भोपाळमध्ये खूप मजा करत आहे. भोपाळच्या छोट्या रस्त्यांपासून ते गजबाजलेल्या मार्केटपर्यंतची झलक तिने फोटोंमधून दाखवली आहे. इतकंच नाही तर नव्याने रस्त्याच्या कडेला अगदी सध्या दुकानात विकल्या जाणाऱ्या भेळेपासून ते बटाटा भजी आणि तळलेल्या मिरच्यांचाही आस्वाद घेतला. यासोबतच एका फोटोत ती छोट्याशा जागी बसून केसही नीट करताना दिसत आहे.

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या लेकीच्या पहिल्या पगाराची गोष्ट; स्वतः श्वेता नंदाने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ यांच्या लाडक्या नातीचा हा साधा अंदाज पाहून चाहतेही आश्चर्याचकित झाले आहेत. नव्या नवेली नंदा फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तर सध्या ती ‘व्हॉट द हेल नव्या’ हा स्वतःचा पॉडकास्ट चॅनल चालवत आहे.