Premium

नवाजुद्दीनच्या पत्नीने केला ‘मिस्ट्री मॅन’बद्दल खुलासा; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “आमचं नातं मैत्रीपेक्षा…”

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीने केला ‘मिस्ट्री मॅन’बद्दल खुलासा

nawazuddin siddiqui wife aaliya siddiqui opens about mystery man
नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीने केला 'मिस्ट्री मॅन'बद्दल खुलासा ( फोटो : इंडियन एक्स्प्रेस )

नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया सिद्दिकी यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. दोघांमधील वाद याआधी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता, परंतु सध्या नवाजुद्दीनची पत्नी आलिया वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच आलिया सिद्दिकीने इन्स्टाग्रामवर एका मिस्ट्री मॅनबरोबरचा रोमॅंटिक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते. यानंतर आता आलियाने एका मुलाखतीदरम्यान या ‘मिस्ट्री मॅन’बद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “वडिलांवर उचलला हात, मृत्यूसाठी केली प्रार्थना …” ‘रोडीज’मध्ये तरुणीने केला धक्कादायक खुलासा, गॅंग लीडर्स झाले निशब्द…

आलिया सिद्दिकीने ‘ई-टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मिस्ट्री मॅनबद्दल खुलासा करताना सांगितले, “होय, मी माझ्या आयुष्यात पुढे गेले असून, आमचे नाते हे मैत्रीपेक्षा जास्त आहे. आमच्यात नातं आहे पण, कोणतीही कमिंटमेंट नाही. मला माझे स्वत:चे आयुष्य माझ्या मुलांसोबत जगायचे आहे. मला माझ्या मुलांना कोणताही त्रास द्यायचा नाही.” तसेच तुम्ही काही चांगले करत असाल, तरीही लोकं तुमच्या बाबतीत वाईटच बोलतात, असे सांगत तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

हेही वाचा : शाहरुख नव्हे तर ‘हा’ बॉलीवूड अभिनेता करणार आर्यन खानच्या ‘स्टारडम’ सीरिजमध्ये कॅमिओ

आलिया पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यात आलेला तो खूप चांगला आणि सच्चा माणूस आहे. त्याची बुद्धिमत्ता पाहून मी त्याच्या प्रेमात पडले. पैसा तुम्हाला आनंद देत नाही, परंतु एखादी व्यक्ती तुम्हाला जरूर आनंदी करते. तो भारतीय नसून इटलीचा रहिवासी आहे आणि आम्ही दोघे एकमेकांना दुबईमध्ये भेटलो होतो. तो माझा खूप आदर करतो आणि माझी खूप काळजी घेतो. आम्ही अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतो.” आलियाने हा खुलासा करताना मिस्ट्री मॅनचे नाव उघड केलेले नाही.

दरम्यान, नवाजुद्दीन आणि आलियामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते, परंतु परस्पर संमतीनंतर अभिनेत्याने आलियावरील मानहानीचा खटलाही मागे घेतला असून सध्या दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य जगत आहेत. आलिया सध्या दुबईत असून, नवाजुद्दीन त्याच्या ‘जोगिरा सारा रा रा रा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 19:52 IST
Next Story
“बरेच मराठी शब्द हे फारसी भाषेतील” नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज…”