बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. सध्या मुलगी मसाबाच्या लग्नामुळे सध्या पुन्हा त्या चर्चेत आहेत. शिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील समस्यांवर त्या नेहमीच स्पष्ट बोलताना दिसतात. आपलं खासगी आयुष्य ते बॉलिवूडमधील संघर्ष या सगळ्यावरच त्यांनी याआधी भाष्य केलं आहे.
नुकतंच त्यांनी शाहरुख खानची मुलगी सुहाना खानबद्दल एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी सुहानाच्या भवितव्याबद्दल भाष्य केलं आहे. त्यांच्यामते सुहाना ही बरीच पुढे जाणार असल्याचंही त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : सेल्फी घेतला, गालावर केलं कीस; रविना टंडन आणि रेखा यांचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी विचारलं, “अक्षय कुठे…”
याविषयी नीना गुप्ता म्हणाल्या, “मला ट्रेंडसेटर व्यक्ती खूप आवडते. हे माझं वैयक्तिक मत आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही त्या पाठडीतील आहे. मला ती प्रचंड आवडते, तिचे लूक्स, तिची फिगर, तिचा अभिनय जेवढा मी पाहिला आहे ते मला प्रचंड आवडतं. मला वाटतं ती ट्रेंडसेटर बनू शकते, तिच्यात ती क्षमता आहे.” याबरोबरच या मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी करीना कपूरचीही उत्तम अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे.
नीना गुप्ता नुकत्याच संजय मिश्रा यांच्याबरोबर ‘वध’ या चित्रपटात झळकल्या होत्या. यात त्यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली. सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मधून मनोरंजनविश्वात पदार्पण करणार आहे. ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.