बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या लाजवाब अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेली अनेकवर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नीना गुप्ता कायमच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलत असतात तसेच बॉलिवूड चित्रपटांविषयीदेखील त्या भाष्य करत असतात. आता नीना गुप्ता नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटात एका आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट अन् याचा विषय बराच बोल्ड आहे, शिवाय यात बरेच बोल्ड सीन्सही पाहायला मिळणार आहेत असं याच्या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. नीना यांनी याआधीही बऱ्याच चित्रपटात अशा बोल्ड भूमिका निभावल्या आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या ऑनस्क्रीन किसिंग सीनबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : शाहरुख, सलमान किंवा अक्षय नव्हे; तर ‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

‘इनसाईड बॉलिवूड’शी संवाद साधतांना नीना गुप्ता म्हणाल्या, “एक कलाकार असल्याने तुम्हाला प्रत्येक सीनसाठी तयार रहावं लागतं. कधी तुम्हाला चिखलात उतरावं लागतं तर कधी तुम्हाला कित्येक तास भर उन्हात उभं राहावं लागतं. बऱ्याच वर्षांपूर्वी मी दिलीप धवन यांच्याबरोबर एक मालिका केली होती. त्या मालिकेत सर्वप्रथम भारतीय टेलिव्हिजनवर लिप टू लिप किसिंग सीन दाखवण्यात आला होता. तेव्हा मला रात्रभर झोप नव्हती कारण आम्ही तेव्हा अगदी चांगले मित्रही नव्हतो आम्ही एकमेकांचे सहकलाकार म्हणून काम करत होतो.”

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, “शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या मी यासाठी तयार नव्हते, मला प्रचंद टेंशन आलं होतं तरी मी स्वतःला यासाठी तयार केलं. तो सीन जसा संपला मी अक्षरशः डेटॉलने गुळण्या केल्या. एका अनोळखी व्यक्तीला कीस करणं ही गोष्टच माझ्यासाठी न पचणारी होती.” त्यावेळी या कीसची क्लिप चॅनलने प्रमोशनमध्ये वापरली अन् नंतर त्यामुळे लोकांनी त्यावर प्रचंड टीकाही केली अन् नंतर तो सीन काढून टाकण्यात आल्याचंही नीना गुप्ता यांनी सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीना गुप्ता यांचा ‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट २९ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर तमन्ना भाटीया, मृणाल ठाकूर, काजोल, कुमुद मिश्रा, विजय वर्मा, अमृता सुभाष, तिलोत्तमा शोम, अंगद बेदीसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.