अभिनेत्री आलिया भट्ट हिने १४ एप्रिल २०२२ रोजी रणबीर कपूरशी लग्न केलं. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत अगदी खाजगी पद्धतीत हा लग्न सोहळा पार पडला. लग्नापूर्वी अनेक महिने रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत असल्याने कपूर परिवारातील सर्वांशीच आलियाशी चांगली ओळख होती. नीतू कपूर आणि आलिया यांच्यातही खूप घट्ट बाण्डींग असल्याचं दिसतं. आता आलिया बद्दल नीतू कपूर यांनी भाष्य केलं आहे.

नीतू कपूर नेहमीच आलियाबद्दल भरभरून बोलत असतात. आलिया आणि त्यांच्यात एक घट्ट नातं तयार झालं आहे. आलिया गरोदर असतानाही तिच्या तब्येतीबाबत नीतू कपूर सर्वांना अपडेट्स देत होत्या. आता पुन्हा एकदा आलिया त्यांना कशी वाटते हे त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : आलिया भट्ट पाठोपाठ श्रिया पिळगावकर दिसणार देहविक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत; म्हणाली, “यासाठी मी…”

नीतू कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ‘डान्स दिवाने जूनियर्स’ हा रिअॅलिटी शो जेव्हा नीतू कपूर जज करत होत्या तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी पापराझींनी नीतू कपूर यांना “आलिया कशी आहे?” असा प्रश्न विचारला. त्यावेळी “आलिया खूपच छान आहे” असं उत्तर नीतू कपूर यांनी दिलं. यावरूनच नीतू कपूर आलियावर भरभरून प्रेम करतात हे पुन्हा एकदा समोर आलं.

हेही वाचा : Photos: मुलीच्या जन्मानंतर ‘अशी’ झाली आहे आलियाची अवस्था; फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ६ नोव्हेंबर रोजी आल्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलियाने आपल्या मुलीचं नाव ‘राहा’ ठेवलं असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. नुकताच राहाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस झाला. यावेळी कपूर आणि भट्ट परिवारातले सर्व एकत्र येत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला.