बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांची फॅशन हा कायम चर्चेचा विषय असतो. सध्या बॉलिवूडमध्ये होणारे वेगवेगळे इवेंट आणि त्यात कित्येक सिने तारकांनी परिधान केलेले कपडे यांची जबरदस्त चर्चा होत आहे. काही वेळा लोक यांचं कौतुक करतात तर बहुतांश अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन प्रचंड ट्रोल केलं जातं. नुकतंच एका इवेंट दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माला या ट्रॉलिंगचा सामना करावा लागला आहे.

‘द सेंट रेगिस मुंबई’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका फॅशनशी निगडीत रॅम्प वॉकमध्ये नेहा शर्माने हजेरी लावली आणि तिच्या हटके आणि बोल्ड आऊटफिटने कित्येकांचं लक्ष वेधून घेतलं. नेहा शर्माने या रॅम्पवॉकसाठी पिवळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. त्यावर परिधान केलेला टॉप मात्र हा प्रचंड बोल्ड असल्या कारणाने नेहाला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : “जर त्याला चित्रपटसृष्टीत यायचं असेल तर…” वेदांतच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल आर. माधवनचं वक्तव्य चर्चेत

या आऊटफिटमध्ये नेहा अत्यंत बोल्ड अवतारात दिसत आहे. नेहा जेव्हा पत्रकारांशी संवाद साधायला आणि फोटोसाठी मीडियासमोर आली तेव्हाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तीचा हा ड्रेस आणखीनच बोल्ड दिसत असल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

काहींनी नेहाच्या या फॅशनचं कौतुक केलं आहे तर बऱ्याच लोकांनी नेहाला खडेबोल सुनावले आहेत. नेहाचा हा रीविलिंग आऊटफिट पाहून नेटकऱ्यांनी तिला उर्फी जावेदची कॉपी, दुसरी उर्फी जावेद असं म्हणत कॉमेंट केल्या आहेत. एका युझरने लिहिलं की, “सुंदर दिसण्यासाठी असे कपडे घालणं अनिवार्य असतं का?” तर आणखी एका युझरने कॉमेंटमध्ये लिहिलं, “काय फायदा जीममध्ये जाण्याचा, ही तर आणखीनच जाड होत चालली आहे.”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहा शर्मा आणि तिची बहीण आयेशा शर्मा या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे जीम लूकमधले फोटोसुद्धा व्हायरल होत असतात. नेहा शर्मा आता नवाझूद्दीन सिद्दीकीबरोबर ‘जोगिरा सारारा’ या चित्रपट झळकणार आहे.