बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बवाल चित्रपटामुळे चर्चेत आहेत. २१ जुलै रोजी हा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. वरुण आणि जान्हवी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान वरुण आणि जान्हवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी वरुणला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा- विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; द कश्मीर फाईल्स’चा पुढचा भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित

फोटोमध्ये वरुण जान्हवीच्या कानाचा चावा घेताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी वरुणला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. एका यूजरने फोटोखाली कमेंट करत लिहिले की, “मला कळत नाही की वरुणने आता हे करू नये असं सगळे का म्हणत आहेत. कारण तो विवाहित आहे. अविवाहित असतानाही त्याने हे करायला नको होते.’दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘जाहवानीने आपली थप्पड मारण्याची कला इथे वापरायला हवी होती.’

Umm whattt
by inBollyBlindsNGossip

‘बवाल’ चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित केलेल्या ३ मिनिटे ३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना वरुण-जान्हवीच्या गोड प्रेमकहाणीत थरारक ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळेल. वरुण धवन आणि जान्हवी कपूर या दोघांनाही पहिल्यांदाच ‘बवाल’च्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. चित्रपटात जान्हवी कपूरने ‘निशा’, तर वरुण धवनने ‘अजय’ ही भूमिका साकारली आहे. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.