अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल यांची लेक न्यासा देवगण कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिचे पार्टी करतानाचे, तर कधी इव्हेंटमधील फोटो व्हायरल होत असतात. पण अजयच्या लाडक्या लेकीचं नाव न्यासा नाही. होय, तिने स्वतःच तिच्या नावाचा योग्य उच्चार सांगितला आहे. तिचं नाव न्यासा किंवा नायसा नाही.
सलमान खानला विराट कोहलीच्या फिटनेसची भुरळ, पण आवडता क्रिकेटपटू दुसराच; नाव सांगत म्हणाला…
अजय देवगणची लेक नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. ती कारमध्ये बसून जाणार होती, यावेळी पापाराझींनी तिला पोज देण्यास सांगितले, तेव्हा पापाराझी तिला ‘नायसा’, ‘न्यासा’ असे आवाज देत होते. त्यावेळी तिने तिचं नाव न्यासा व नायसा नसल्याचं सांगितलं. माझं नाव ‘निसा’ आहे, असं ती म्हणाली.
दरम्यान, ‘इन्स्टंट बॉलिवूड’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी तिच्या नावाचा उच्चार वेगळा असेल तर नावाचं स्पेलिंगही तसंच लिहायला हवं असा सल्ला दिला आहे.
