scorecardresearch

‘ऑपरेशन एएमजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; युक्रेनमधील १६००० भारतीयांना मायदेशी आणतानाचा संघर्ष उलगडणार मोठ्या पडद्यावर

या पोस्टरमध्ये ऑपरेशनची झलक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दिसणारी एक पाठमोरी व्यक्ती पाहायला मिळत आहे

operation amg poster
फोटो : सोशल मीडिया

गेल्यावर्षी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने साऱ्या जगाला चिंतेत टाकलं होतं. दोन्ही देश त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्य होते पण सामान्य जनतेला याची चांगलीच किंमत मोजावी लागली. यामुळे साऱ्या जगभरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये कित्येक भारतीय रहिवासी आणि विद्यार्थी अडकले होते.

युक्रेनमध्ये अडकलेल्या १६००० भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने एक ऑपरेशन आखलं आणि ते दणक्यात यशस्वीदेखील करून दाखवलं. भारताच्या या अभूतपूर्व ऑपरेशनवर लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : ‘Aticle 370’बद्दल भाष्य करणारा ‘द काश्मीर फाइल्स’मधील डिलीट केलेला सीन पाहिलात का? विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत

‘ओपेरेशन एएमजी’असं या चित्रपटाचं नाव आहे. एबीना एंटरटेनमेंट कृत हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच याचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून सोशल मीडियावर याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टरमध्ये ऑपरेशनची झलक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दिसणारी एक पाठमोरी व्यक्ती पाहायला मिळत आहे.

चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट कोमल नहाटा यांनीदेखील या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. युक्रेनमध्ये फसलेल्या १६००० भारतीयांना सुखरूप कशाप्रकारे मायदेशी आणण्यात आलं यावर हा चित्रपट बेतलेला असेल. सुनील जोशी आणि नीतू जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ध्रुव लाथेर हे याचं दिग्दर्शन करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:20 IST