अभिनेता जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat) त्याची वेब सीरिज ‘पाताल लोक सीझन २’ मुळे चर्चेत आहेत. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडमधील ‘नेपोटिझम’ आणि ‘आउटसाइडर-इनसाइडर’ या विषयावर आपले मत मांडले आहे. त्याने ‘नेपो किड्स’च्या संघर्षांबद्दल बोलताना आलिया भट्टसारख्या स्टार किड्सलाही विविध आव्हानांना सामोरे जावे लागते, असे सांगितले.

जयदीप अहलावत एका मुलाखतीत म्हणाला, “त्यांचे स्वतःचे संघर्ष असतील. आलिया भट्ट (Alia Bhatt) ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. कल्पना करा, जर तिला दिवसभर ‘नेपो किड, नेपो किड’ असे कमेंट्स वाचावे लागले तर? जर ती महेश भट्ट यांच्या घरी जन्माला आली असेल, तर त्यात तिची काय चूक आहे? जे मुलं किंवा मुली तीन-चार वर्षांच्या वयापासून चित्रपट पाहत आणि त्यावर चर्चा करत मोठे होत असतात, त्यांना हे क्षेत्र नैसर्गिकरित्या अधिक चांगल्या प्रकारे समजते.”

ही त्यांची चूक नाही

जयदीप पुढे म्हणाला, ” एखाद्या डॉक्टरच्या मुलाबरोबर जे होतं हे अगदी तस आहे . जर लोक त्याला रोज म्हणाले, ‘ओह, तू डॉक्टरचा मुलगा आहेस, त्यामुळे तूही डॉक्टर होणारच,’ तर त्याला वाईट वाटणार नाही का? त्यात त्यांची चूक नसते.”

जयदीप अहलावतने ‘राझी’ चित्रपटात आलिया भट्टबरोबर काम केले आहे. त्याने सेटवरील आलियाच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाची आठवण सांगितली. तो म्हणाला, “आलिया सेटवर खूप तयारीनिशी येते. हे तुम्ही ‘राझी’मध्ये पाहू शकता. आम्ही जेव्हा एकत्र काम केलं, तेव्हा तिच्या भूमिकेसाठी तिने किती मेहनत घेतली होती, हे स्पष्ट दिसत होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पाताल लोक सीझन २’ मध्ये दमदार अभिनय

जयदीप अहलावतने ‘पाताल लोक सीझन २’ मध्ये केलेल्या अभिनयाची जोरदार चर्चा होत आहे. ही सिरीज १७ जानेवारी २०२५ रोजी ‘प्राइम व्हिडीओ’ वर रिलीज झाली आहे. गेल्या काही वर्षांत जयदीपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘राझी’ आणि ‘महाराज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.