प्रसिद्ध भारतीय रॅपर बादशाह अन् पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मागच्या काही महिन्यात खूपदा बादशाह व हानिया यांचे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हानियाने डेटिंगच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत हानियाने बादशाहबरोबर अफेअर असल्याच्या अफवांवर मौन सोडलं आहे. ती आणि बादशाह फक्त चांगले मित्र आहेत, असं तिने म्हटलं आहे. तसंच जर ती विवाहित असती तर लोकांनी त्याच्या व बादशाहच्या मैत्रीबद्दल अशा चर्चा केल्या नसत्या असंही हानिया म्हणाली.

अवघ्या १० महिन्यांत मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न; पतीच्या अफेअरबद्दल स्क्रीनशॉट्स केले शेअर

‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हानियाला तिच्या आताच्या सर्वात आवडत्या गाण्याबद्दल विचारण्यात आलं. यावर तिने बादशाह, हितेन आणि करण औजला यांच्या ‘गॉड डॅम’ गाण्याचं नाव घेतलं. हे गाणं चांगलं आहे, असं ती म्हणाली. यानंतर मुलाखतकाराने तिचं उत्तर बादशाहबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना खतपाणी घालणारं असल्याचा विनोद केला. त्यावर हसत “नाही, हे एक खूप चांगलं गाणं आहे,” असं ती म्हणाली.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

हानियाने तिची व बादशाहची मैत्री कशी झाली, याबाबतही सांगितलं. इंटरनेटवर आपली व बादशाहची मैत्री झाली, असा खुलासा तिने केला. “इन्स्टाग्रामवर मी शेअर केलेल्या एक मजेशीर रीलवर त्याने काहीतरी कमेंट केली होती आणि माझा मित्र म्हणाला, ‘मला वाटतं की बादशाहने तुझ्या पोस्टवर कमेंट केली आहे.’ मी म्हणाले, ‘खरंच?’ आणि मग मी ती कमेंट पाहिली. त्याने मला मेसेजही केला होता. त्यानंतर मेसेजवर आमचं थोडं बोलणं झालं,” असं हानिया म्हणाली.

प्रियांका गांधींच्या मुलांनी पहिल्यांदा केलं मतदान; रेहान अन् मिराया वाड्रा काय करतात? जाणून घ्या

“बादशाह हा एक खूप चांगला मित्र आहे. तो एक छान, साधा माणूस आहे. तो खूप चांगला आहे आणि तो खरा आहे. मला वाटतं की आमच्यात हीच गोष्ट कॉमन आहे आणि म्हणूनच आम्ही मित्र आहोत. खरं सांगायचं झाल्यास जर मला काहीच चांगलं वाटत नसेल किंवा मी सोशल मीडियावर पोस्ट करत नसेल तर तो मला विचारतो ‘काय झालंय, ठिक आहेस ना?’” असं हानियाने नमूद केलं.

एप्रिलमध्ये बादशाह हानियाला भेटण्यासाठी दुबईला गेला होता. त्यांच्या भेटीचे फोटो हानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

Live Updates