अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला १ वर्ष २ महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने परिणीती आणि राघव चड्ढा यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. यानिमित्ताने परिणीतीची आई रीना चोप्रा यांनी देखील दोघांना खास भेटवस्तू दिली. सध्या याची चांगली चर्चा सुरू आहे.

आईने दिलेल्या खास भेटवस्तूचा फोटो परिणीती चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लेक आणि जावयाच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रीना चोप्रा यांनी सुंदर चित्र रेखाटलं आहे. लग्नामधील परिणीती आणि राघव चड्ढा यांनी एकमेकांचा हातात हात घेतलेल्या फोटोचं चित्र रीना यांनी काढून त्यांना भेटवस्तू म्हणून दिलं आहे. याचा फोटो शेअर करत परिणीतीने पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – Video: ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकीचा जाऊबाईबरोबर दाक्षिणात्य लोकगीतावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

परिणीती चोप्राने लिहिलं आहे की, यामागची जबरदस्त कलाकार माझी आई आहे…हे किती सुंदर चित्र काढलं आहे, यावर तुम्ही विश्वास करू शकता का? अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुंदररित्या रेखाटली आहे. हे चित्र एखाद्या कलाकृतीपेक्षा खूप काही आहे. हे तुझं आमच्या दोघांवरील प्रेमाचं प्रतिबिंब आहे. धन्यवाद आई.

हेही वाचा – Bigg Boss 18: सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये रजत दलालकडे दिला मोठा अधिकार; ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

परिणीतीच्या या पोस्टवर राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सासूबाईंचे आभार मानत लिहिलं आहे, “हॅलो रीना चोप्रा…आता आपल्याला सर्वांना कळालंच असेल की परीमध्ये कलेचा किडा कसा आणि कोणाकडून आला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने आतापर्यंत दिलेल्या भेटवस्तूंपैकी सर्वात सुंदर भेटवस्तू तुम्ही दिली आहे. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.”

राघव चड्ढा यांची प्रतिक्रिया
राघव चड्ढा यांची प्रतिक्रिया

हेही वाचा – Bigg Boss 18: “हे काय चाललंय?” सलमान खानच्या शोमधील तीन हॉट वाइल्ड कार्डची एन्ट्री पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पाहा प्रोमो

त्यानंतर रीना चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “ओ माय गॉड…धन्यवाद. माझ्या मते, मी यामध्ये खूप खोलवर भावनिकरित्या गुंतले होते. हे माझ्यासाठी फक्त चित्र नाही. तर प्रेम, एकजुटीचं आणि तुम्ही दोघं आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहात याचं चित्रण आहे. मला माहित नाही की, मी या चित्राला पूर्णपणे न्याय देऊ शकले. नेहमी एकमेकांचा हात धरून एकमेकांवर अनंतकाळ प्रेम करण्याची ही आठवण असू दे. तुम्हाला हे चित्र आवडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या दोघांवर माझं सदैव प्रेम आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
रीना चोप्रा प्रतिक्रिया
रीना चोप्रा प्रतिक्रिया

दरम्यान, परिणीती चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘अमर सिंह चमकीला’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात परिणीती दिलजीत दोसांझबरोबर पाहायला मिळाली होती. इम्तियाज अलीने ‘अमर सिंह चमकीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट फक्त ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. याशिवाय परिणीतीकडे ‘जहूर’, ‘शिद्दत 2’, ‘प्रेम की शादी’ आणि ‘सनकी’सह बरेच चित्रपट आहेत. लवकरच तिचे हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.