अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा या दोघांच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वी ते मुंबईत एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या अफेअर व लग्नाच्या चर्चा सातत्याने सुरू आहे. अशातच हे दोघे आयपीएलचा सामना पाहायला स्टेडियममध्ये गेल्याचं पाहायला मिळालं. राघव व परिणीतीला एकत्र पाहून क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडलं.

हेही वाचा – “आम्ही एकत्र आंघोळ करायचो, कारण…”; अश्नीर ग्रोव्हरच्या पत्नीचा खुलासा

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्या दरम्यानचा आयपीएल सामना पाहण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहालीत पोहोचलेल्या राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत, पण व्हिडीओ मात्र खूपच मजेदार दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. या वेळी परिणीती चोप्राला पाहून चाहत्यांनी ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राला ‘परिणीती भाभी जिंदाबाद’चे नारे ऐकून आपले हसू आवरता आले नाही. हे ऐकून परिणीतीने डोक्याला हात लावला. दोघांचाही हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, परिणीती व राघव १३ मे रोजी साखरपुडा करणार असून ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधतील अशी चर्चा आहे, पण त्यांनी याबद्दल अधिकृत भाष्य केलेलं नाही.