परिणीती चोप्राने सप्टेंबर महिन्यात राजकीय नेते राघव चड्ढा यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिचा मिशन रानीगंज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, पण या चित्रपटाने फार चांगली कमाई केली नाही. सध्या ती तिच्या ‘चमकीला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान, परिणीती चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिच्या कामाबद्दल आहे.

लग्नानंतर परिणीती पतीप्रमाणे राजकारण जाईल, अशा चर्चाही होत्या. तिला याबाबत विचारण्यात आलं होतं, ज्यावर तिने आपल्याला राजकारणात रस नसल्याचं म्हटलं होतं. पण आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत करिअरबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. परिणीती संगीत क्षेत्रात करिअरची सुरुवात करणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

परिणीती चोप्रा तिच्या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर करताना अभिनेत्रीने एक लांबलचक कॅप्शनही लिहिलं आहे. “संगीत हे माझ्यासाठी नेहमीच हॅप्पी प्लेस राहिलंय. मी अनेक संगीतकारांना अनेक वर्षांपासून स्टेजवर परफॉर्म करताना पाहत आले आहे. आता मीही या जगाचा एक भाग होणार आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते. माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे,” असं परिणीतीने लिहिलं आहे.

९ वर्षांच्या चाहत्याने कॅन्सरवर मात केल्यानंतर सलमान खानने दिलेलं वचन केलं पूर्ण; मुलाची आई म्हणाली, “त्याच्या मेंदूमध्ये गाठ…”

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीतीच्या या पोस्टवर चाहते आणि बॉलीवूडमधील तिचे मित्र-मैत्रिणी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहते तिला खूप शुभेच्छा देत आहेत. मनीष मल्होत्रानेही परिणीतीच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.