Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पाडला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या साखरपुड्यासाठी सिनेसृष्टी आणि राजकारणातील १०० हून अधिक लोक उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे खास फोटो समोर आले आहे.

आपचे खासदार राघव चड्ढा यांनी नुकतंच सोशल मीडियावर साखरपुड्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : खासदार राघव चड्ढांपेक्षा श्रीमंत आहे परिणीती चोप्रा; जाणून घ्या दोघांची एकूण संपत्ती

या कार्यक्रमासाठी परिणिती आणि राघव यांनी खास लूक केला होता. यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघव यांनी त्याच रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. “मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”, असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे. त्याबरोबरच त्यांनी अंगठीचा इमोजीही शेअर केला आहे.

आणखी वाचा : “…तोपर्यंत मी लग्न करणार नाही”, परिणीती चोप्राने ‘त्या’ प्रश्नावर दिलेले थेट उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा आणि मनीष मल्होत्रा यांनीही हजेरी लावली. परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी बॉलिवूड थीम ठेवण्यात आली होती. यावेळी अनेक राजकीय क्षेत्रातील दिग्गजही उपस्थितीत होते.