scorecardresearch

“ट्रोलिंगचा माझ्या आयुष्यावर…”; बॉडी शेमिंगबद्दल परिणीतीचं वक्तव्य चर्चेत

“मला नेहमीच माझ्या शरीरात बदल घडवून आणायचा होता. मी अनेक वर्ष…”

“ट्रोलिंगचा माझ्या आयुष्यावर…”; बॉडी शेमिंगबद्दल परिणीतीचं वक्तव्य चर्चेत
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

परिणीती चोप्राचा सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘उंचाई’ चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत आहे. या वर्षी तिचा ‘तिरंगा’ चित्रपट आला होता. त्यावेळी तिला वाढत्या वजनामुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर परिणीतीने मेहनत घेतली आणि तिने वजन कमी केलं आणि ट्रोलिंगही बंद झालं.

“मला दुसर्‍या भाषेत…” मुलाखती दरम्यान परिणीती चोप्राने केला खुलासा

अलीकडेच नवी दिल्ली येथे ‘अजेंडा आज तक २०२२’ मध्ये ‘उंचाई पर परिणीती’ नावाच्या एका कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींसह बॉडी-शेमिंगबद्दलही भाष्य केलं. यावेळी परिणीती म्हणाली की, “पूर्वीच्या मुलाखतींमध्ये बॉडी-शेमिंगबद्दल विचारलं असता मी नेहमी वेगळ्या पद्धतीने बोलली आहे. बऱ्याचदा अनेक सेलिब्रिटींना याबाबत विचारण्यात येतं, तेव्हा त्या प्रत्येकाच्या मते त्यांना ते जसेच आहेत, तसेच आवडतात. त्यामुळे त्यांना बदलायला सांगू नये. पण, माझा नेहमीच वेगळा विचार असायचा. मी नेहमी म्हणायचे की त्या ट्रोलिंगचा, बॉडी शेमिंगचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे तुम्हीच ठरवायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात बदल घडवायचा असेल, तुम्हाला तंदुरुस्त व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारायचं असेल, तुम्हाला तुमचा स्टॅमिना सुधारायचा असेल आणि कोणीतरी तुम्हाला प्रेरित करत असेल, तर ते सकारात्मकतेने घ्या. पण कोणतेही कारण नसताना ट्रोल्सद्वारे नकारात्मक पद्धतीने केले जाणारे बॉडी शेमिंग दुर्लक्षित करायला पाहिजे.”

शाहरुख-सलमान लहान अभिनेत्रींशी रोमान्स का करतात? काजोल म्हणाली, “फिल्म इंडस्ट्रीतील हिरोंना….”

ती पुढे म्हणाली, “मला नेहमीच माझ्या शरीरात बदल घडवून आणायचा होता. मी अनेक वर्ष वाढलेल्या वजनासह जगले आहे. मी अनेक वर्ष फिट नव्हते. सकाळी उठण्याचाही स्टॅमिना माझ्यात नव्हता. त्यामुळे जेव्हा मला कुणीतरी म्हटलं की तुला तंदुरुस्त व्हायची गरज आहे, तेव्हा मी ते प्रोत्साहन म्हणून स्वीकारलं कारण मला स्वतःमध्ये बदल घडवायचा होता. मी एक अभिनेत्री होते आणि माझे फोटो मी रोज बघायचे, मी स्वतःला स्क्रीनवर बघायचे, त्या गोष्टीने मला प्रेरणा मिळाली की मी अजून चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आता मी दिवसातील १२ तास काम करू शकते. ट्रोलिंगचा माझ्या आयुष्यावर वेगळ्या रितीने प्रभाव पडला. बरेच लोक ते नकारात्मकरित्या घेतात, पण मी ते स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन म्हणून स्वीकारलं. मी त्याला माझी ताकद बनवं आणि मी ते बदल माझ्या शरीरात घडवले, त्यासाठी मी खूप खूश आहे, कारण तेव्हापेक्षा आता मी जास्त आनंदी आहे,” असं परिणीतीने ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगबद्दल बोलताना सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:57 IST

संबंधित बातम्या