शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. २०२३ मधील हा पहिला बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट आहे. बेशरम गाण्यामुळे झालेल्या वादानंतर चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंडचं सावट होतं. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याबदद्ल उत्सुकता होती. पण, शाहरुखच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली असून चाहते ‘पठाण’ला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर लीक; सलमानची दमदार अ‍ॅक्शन, डायलॉग्स अन् कहाणीत ट्विस्ट, पाहा व्हिडीओ

चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून देशभरात ३०० शो वाढवण्यात आले आहेत. ‘पठाण’साठी थिएटर मालक व एक्जिबिटर्सनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. असं क्वचितच कोणत्याही चित्रपटासाठी करण्यात आलं असेल. ‘पठाण’ हा हिंदी चित्रपटसृष्टीत इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’ आज जगभरात ८ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज झालेल्या ‘पठाण’च्या एकूण स्क्रीन्सची संख्या ८००० आहे, ज्यामध्ये देशांतर्गत म्हणजे भारतात ५,५०० स्क्रीन, परदेशातील स्क्रीन्सची संख्या २५०० आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’मुळे रितेश देशमुखच्या ‘वेड’सह इतर मराठी चित्रपटांना फटका बसणार? थिएटर मिळत नसल्याच्या चर्चा

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी त्याचा स्क्रीन काउंट एवढ्या प्रमाणात वाढवला गेला आहे. ‘पठाण’ची चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रेक्षक चार वर्षांपासून त्याच्या लाडक्या शाहरुखच्या पुनरागमनाची वाट पाहत होते.

“…तर राज्यभर आंदोलन करू” मनसेचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा; म्हणाले, ‘पठाण’ला विरोध…

भगव्या बिकिनीमुळे वादात सापडलेल्या ‘पठाण’ने कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम मोडले आहेत. पहिल्याच दिवशी चाहते चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathaan 300 shows increased by exhibitors right after first show in india hrc
First published on: 25-01-2023 at 17:13 IST